नवी दिल्ली : डेबिट आणि क्रेडिट कार्डाची सुविधा देणारी मास्टरकार्ड ही कंपनी लवकरच एकूण कर्मचाऱ्यांच्या ३ टक्के कामगारांची कपात करण्याच्या विचारात आहे.
कंपनी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सुमारे १ हजार जणांना नारळ देणार आहे, असे ब्लूमबर्गच्या एका अहवालात म्हटले आहे. यामुळे भारतासह अनेक देशांमधील कर्मचारी कमी होतील. कंपनीने २०२२ पर्यंत ३३ हजार कर्मचारी नियुक्त केले. ६७ टक्के जण अमेरिकेबाहेर काम करतात.