नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन खात्याच्या (PM Jandhan Account) माध्यमातून लोकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजेच डीबीटीद्वारे लोकांना थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळतात. प्रधानमंत्री जन धन खात्याची मुख्य गोष्ट म्हणजे ते शून्य शिल्लक खाते (झिरो बॅलन्स अकाउंट) आहे आणि कमी उत्पन्न गटातील लोक देखील ते उघडू शकतात. आता या खात्यांच्या अशा सुविधेबद्दल जाणून घेतले पाहिजे, ज्या अंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो.
जन धन खात्यांमध्ये, तुमच्याकडे शून्य शिल्लक असली तरीही तुम्ही 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा घेऊ शकता. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा अर्थ असा आहे की, खात्यात शिल्लक नसली तरीही ग्राहक बँक खात्यातून मर्यादित रक्कम काढू शकतात. यापूर्वी ही सुविधा जनधन खात्यांमध्ये फक्त 5,000 रुपयांत होती, मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने ही सुविधा 10,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
कोणाला मिळतो ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ?
या 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते 6 महिन्यांपेक्षा जुने असले पाहिजे आणि पैसे काढणाऱ्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओव्हरड्राफ्ट सुविधा 6 महिन्यांपूर्वी खात्यांवर देखील उपलब्ध असेल, परंतु ती फक्त 2000 रुपयांपर्यंत असेल.
जन धन खाते
2014 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने शून्य शिल्लकवर जन धन खाती उघडण्यास परवानगी दिली. यापूर्वी देशातील प्रत्येकाला खाते असण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे ध्येय होते. कालांतराने, थेट अनुदान, शिष्यवृत्ती, सरकारी पेन्शन, पीएम किसान सन्मान निधी योजना, सरकारद्वारे दिले जाणारे गॅस सबसिडी प्रदान करण्याचा त्याचा उद्देश वाढला. देशातील प्रत्येकाला आर्थिक समावेशाच्या कक्षेत आणण्यासाठी ही खाती उघडण्यात आली. त्यानंतर पीएम जन धन खाती खूप लोकप्रिय झाली आणि त्याद्वारे सरकारने लोकांपर्यंत योजनांचे पैसे पोहोचवले.