Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० कोटी लाेकांचे पैसे हाेणार परत; ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन

१० कोटी लाेकांचे पैसे हाेणार परत; ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन

‘सहारा’ गुंतवणूकदारांना दिलासा, अमित शाहांकडून ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:05 AM2023-07-19T07:05:07+5:302023-07-19T07:05:38+5:30

‘सहारा’ गुंतवणूकदारांना दिलासा, अमित शाहांकडून ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन

10 crores money will be returned; Inauguration of 'Refund Portal' by amit shah | १० कोटी लाेकांचे पैसे हाेणार परत; ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन

१० कोटी लाेकांचे पैसे हाेणार परत; ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सहारा इंडियाच्या को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या १० कोटी लोकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. ४ कोटी गुंतवणूकदारांपासून पैसे परतीच्या योजनेची सुरुवात होत आहे. केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी राजधानी दिल्लीत ‘सहारा रिफंड पोर्टल’ मंगळवारी सुरू केले. 

यावेळी अमित शाह यांनी सांगितले की, अर्ज केल्यानंतर गुंतवणूकदारास ४५ दिवसांत पैसे परत मिळतील. हे पैसे थेट गुंतणूकदाराच्या खात्यात हस्तांतरित होतील. पोर्टलच्या माध्यमातून सहाराच्या ४ सहकारी सोसायट्यांचे गुंतवणूकदारच अर्ज करू शकतील. या गुंतवणूकदारांत बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांतील नागरिकांची संख्या अधिक आहे.

‘सहारा-सेबी रिफंड अकाउंट’ खात्यातून ५ हजार कोटी रुपये  केंद्रीय सहकारी निबंधकांच्या खात्यात वळते केले आहेत. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांची यांच्या देखरेखीखाली पैसे परत करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.

पहिल्या टप्प्यात १० हजार रुपये मिळतील परत
गुंतवणूकदारांचे कितीही पैसे सहारामध्ये अडकलेले असले तरी पहिल्या टप्प्यात केवळ १० हजार रुपयांपर्यंतच पैसे परत मिळतील. 

१.०७ कोटी गुंतवणूकदारांना सर्व पैसे परत मिळतील. कारण त्यांच्या ठेवी १० हजार रुपयांच्या आत आहेत. 
४ कोटी गुंतवणूकदारांना ५ हजार कोटी रुपये परत मिळतील. दुसऱ्या टप्प्यात सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी घेऊन जास्त रक्कम मिळेल.

हे दस्तावेज बंधनकारक...
पैसे परत मिळण्यासाठी गुंतवणूकदाराकडे कंपनीचा सदस्य क्रमांक, गुंतवणूक खाते क्रमांक, आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक, ठेवीचे प्रमाणपत्र/पासबुक आणि पॅन कार्ड (गुंतवणूक ५० हजारांपेक्षा अधिक असल्यास) असणे आवश्यक आहे. 

काय आहे प्रकरण? 
nसहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत राॅय यांच्या दाेन कंपन्यांमध्ये लाेकांनी हजाराे काेटी रुपये गुंतविले हाेते. 
nही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आराेप करण्यात आला हाेता. प्रकरण सर्वाेच्च न्यायालयापर्यंत गेले हाेते. 
nन्यायालयाने २४ हजार ४०० केाटी रुपये परत करण्याचे आदेश दिले हाेते. या प्रकरणी सुब्रत राॅय यांना बराच काळा तुरुंगात राहावे लागले हाेते.

या ४ संस्थांचे गुंतवणूकदार 
करू शकतील अर्ज

सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, लखनौ.
सहारायन यूनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, भोपाळ.
हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, कोलकाता.
स्टार्स मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, हैदराबाद.

Web Title: 10 crores money will be returned; Inauguration of 'Refund Portal' by amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.