Join us

टॅक्स भरताय? एक एप्रिलपासून बदलतायत हे दहा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 7:41 PM

नवीन आर्थिक वर्षात करांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

नवी दिल्ली - नवीन आर्थिक वर्षात करांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही पण अन्य काही बदल केलेले आहेत. शेअर्स आणि म्युचल फंडच्या कमाईतून मिळालेल्या भांडवली नफ्यावर आता टॅक्स लागणार आहे. 2018 च्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी सादर केलेले प्रस्ताव एक एप्रिल पासून लागू होणार आहेत. त्या अंतर्गत इन्कम टॅक्सच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यावर एक नजर टाकूयात....

  • यंदाच्या बजेटमध्ये पेंशनधारक आणि नोकरदार वर्गाला 40 हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन देण्यात आलं आहे. पण त्याबरोबरच 19, 200 रुपये वाहतूक भत्ता आणि 15 हजार रुपयांची मिळणारा वैद्यकीय भत्ता बंद करण्यात आला आहे.  
  • वैयक्तिक टॅक्सपेयर्सच्या उत्तपन्नाच्या टॅक्सवरील सेस वाढवून चार टक्के करण्यात आला आहे. जो व्यक्ती आता जेवढा टॅक्स भरतो त्याच्या चार टक्के आरोग्य आणि शिक्षण (आरोग्य आणि शिक्षण सेस)ला द्यावे लागतील. याआधी तो 3 टक्के होता. सेसमधून मिळणारी रक्कम केंद्र सरकारकडे राहते तर टॅक्समधून काही रक्कम राज्य सरकारला दिली जाते. 
  • शेअर्स किंवा म्युचल फंडात एक वर्ष किंवा त्याहून आधिक काळ केलेल्या गुंतवणूकीतून एक लाख रुपयांपेक्षा आधिक नफा असेल तर त्यावर 10 टक्के भांडवली टॅक्स लागू केला जाईल. 31 जानेवारी 2018 पर्यंत मिळालेला नफावर टॅक्स लागणार नाही पण एक फेब्रुवारीपासून त्यावर टॅक्स सुरु होईलय 
  • एक वर्ष आपण विमाची रक्कम देत असेल तर कंपन्या आपल्याला काही सवलत देत आसते. आपण 25 हजाप रुपयापर्यंतच्या रकमेवर टॅक्स डिडक्शन क्लेम करत होतो. पण आता याची मर्यादा वाढवून दोन वर्ष केली आहे. दोन वर्ष जर एखादी विमा कंपनीमध्ये 40 हजार रुपये जमा करत असेल आणि त्यावर ती कंपनी तुम्हाला 10 टक्के सलवत देत असेल तर तुम्ही दोन वर्ष प्रत्येकी 20 हजार रुपये टॅक्स डिडक्शन क्लेम करु शकता. 
  • नॅशनल पेंशन सिस्टम (एनपीएस) मध्ये जमा असलेली रक्कम काढल्यानंतर त्यावर मिळणारी टॅक्स सूटसाठी आता जे कर्मचारी नाहीत तेही क्लेम करु शकतात. 
  • ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्यावर 50 हजारापर्यंतची करसवलत देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे पोस्टात किंवा बँकमध्ये जमा केलेल्या पैशावर 50 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या व्याजाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. 
  • इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 80 टीटीए नुसार जर एखाद्या व्यक्तीला व्याजावर जर 10 टक्के सुट मिळत होती. आता यामध्ये नवा सेक्शेन जोडण्यात आला आहे.  80 टीटीबीनुसार आता ज्येष्ठ नागरिकांच्या  FDs आणि RDsवर मिळालेलं व्याज आता टॅक्स फ्री असणार आहे. 
  • प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)नुसार गुंतवणूकीची मर्यादा 7.5 लाखावरुन 15 लाख करण्यात आली आबे. याध्ये जमा असेलेल्या पैशावर 8 टक्के व्याज मिळणार आहे. 
  • विशिष्ट प्रकारच्या रोगांवर उपचारासाठी लागलेल्या खर्चावरील टॅक्स सूटची मर्यादा एक लाख रुपये केली आहे. याआधी 80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिंकांसाठी 80000 रुपये आणि  60 ते 80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना 60  हजार रुपयांवरील खर्चा टॅक्स फ्री होता. 
  • सेक्शन 80D नुसार वरिष्ठ नागरिकांच्या वैद्यकिय विमा आणि जनरल मेडिकल एक्सपेंडिचर वर टॅक्स सूटची मर्यादा वाढून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ही 30 हजार रुपये होती.  
टॅग्स :इन्कम टॅक्सआयकर मर्यादा