Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० लाख बँक कर्मचारी बुधवारी संपावर

१० लाख बँक कर्मचारी बुधवारी संपावर

देशभरातील १० लाख बँक कर्मचारी बुधवारी संपावर जात आहेत. सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 05:58 AM2018-12-24T05:58:17+5:302018-12-24T05:58:31+5:30

देशभरातील १० लाख बँक कर्मचारी बुधवारी संपावर जात आहेत. सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

10 lakh bank employees strike on Wednesday | १० लाख बँक कर्मचारी बुधवारी संपावर

१० लाख बँक कर्मचारी बुधवारी संपावर

मुंबई : देशभरातील १० लाख बँक कर्मचारी बुधवारी संपावर जात आहेत. सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या विरोधात कर्मचाऱ्यांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक्स युनियन (यूएफबीयू) या संयुक्त युनियनने या संपाची हाक दिली आहे.
देशातील २१ पैकी १९ सरकारी बँका सध्या भीषण तोट्यात आहेत. बँकांना या संकटातून बाहेर काढण्याचा दावा करीत सरकारने त्यांचे विलीनीकरण सुरू केले आहे. देना बँक व विजया बँकेचे बँक आॅफ बडोदा या देशातील तिसºया क्रमांकाच्या मोठ्या बँकेत विलीनीकरण होत आहे, पण यामुळे सरकारी बँकांची स्थिती आणखी भयावह होईल, असे युनियने म्हणणे आहे. त्या विरोधात केवळ अधिकाºयांनी शुक्रवार, २१ डिसेंबरला संप पुकारला होता. आता बुधवार, २६ डिसेंबरला कर्मचारी संपावर जात असून, अधिकारी वर्गाने पुन्हा संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.

आॅल इंडिया बँक एम्प्लाइज असोसिएशनचे राज्य सरचिटणीस देविदास तुळजापुरकर यांनी सांगितले की, या आधी सहयोगी बँकेचे स्टेट बँकेत विलीनीकरण केल्याने ही मुख्य बँक इतिहासात पहिल्यांदा तोट्यात गेली. बँकेच्या १,६०३ शाखा बंद कराव्या लागल्या. हा प्रयोग पूर्णपणे फसल्यानंतरही सरकार विलीनीकरणाचा घाट घालत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी देशभरातील १०० टक्के कर्मचारी व अधिकारी संप पुकारत आहेत.
सलग दोन संपांमुळे मागील सहा दिवसांत बँका फक्त सोमवारी सुरू असतील. मंगळवारी पुन्हा ख्रिसमसमुळे बँकांना सुट्टी असेल.
 

Web Title: 10 lakh bank employees strike on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.