Join us

दहा लाख कोटींची कर्जे बँकांच्या वसुलीतून वगळली; अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 7:44 AM

 गेल्या पाच वर्षांमध्ये बँकांनी ६ लाख ५९ हजार ५९६ काेटी रुपयांची वसुली केली आहे. त्यात निर्लेखित केलेल्या १ लाख ३२ हजार ३६ काेटी रुपयांच्या निर्लेखित कर्जांचाही समावेश आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये बँकांनी तब्बल १० लाख ९ हजार ५११ काेटी रुपयांची थकीत कर्जे राइट ऑफ अर्थात निर्लेखित केली आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात राज्यसभेत माहिती दिली. 

एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, बँकांकडून करलाभ मिळविण्यासाठी तसेच लेखाजाेखा दुरुस्त करण्यासाठी एनपीए निर्लेखित करतात. याचा कर्जदाराला काेणताही फायदा हाेत नाही. त्यांच्याकडून कर्जवसुलीची प्रक्रिया सुरूच राहते. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ कर्जाची परतफेड न झाल्यास ती एनपीए अर्थात अनुत्पादित म्हणून जाहीर करण्यात येतात.  गेल्या पाच वर्षांमध्ये बँकांनी ६ लाख ५९ हजार ५९६ काेटी रुपयांची वसुली केली आहे. त्यात निर्लेखित केलेल्या १ लाख ३२ हजार ३६ काेटी रुपयांच्या निर्लेखित कर्जांचाही समावेश आहे.

निर्लेखित कर्जांचे काय हाेते?थकीत कर्जे निर्लेखित केल्यानंतरही ते वसूल करण्यासाठी बँकांची कार्यवाही सुरूच राहते. न्यायालये किंवा कर्जवसुली न्यायाधिकरणांमध्ये खटले दाखल करणे, दिवाळखाेरी कायद्यांतर्गत मालमत्तांची विक्री करणे इत्यादी पर्याय बँकांसमाेर असतात.

काेणाची कर्जे निर्लेखित केली? नावे सांगाn कर्जांना निर्लेखित करण्यावरून विराेधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्तीने कर्जाची परतफेड न केल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई हाेते. n मात्र, बड्या उद्याेगपतींनी हजाराे काेटी रुपयांची कर्जे घेतली आणि त्यांची परतफेडही केली नाही. त्यांची कर्जे निर्लेखित करण्यात आली. सरकारने अशा लाेकांची नावे जाहीर करायला हवी, असेही जलील म्हणाले. 

एनपीए निम्म्यावरआरबीआयने माहितीच्या अधिकारांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षांमध्ये १३ लाख २२ हजार काेटींची कर्जे निर्लेखित करण्यात आली हाेती. त्यापैकी १० लाख काेटींचा आकडा हा गेल्या ५ वर्षांतीलच आहे. निर्लेखित केल्यामुळे बँकांचा एनपीए निम्म्याने कमी झाला आहे.

नावे गुलदस्त्यातचकर्जबुडव्यांची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, चाैकशीनंतर गुन्हे दाखल असलेल्या बड्या कंपन्यांमध्ये गीतांजली जेम्स, काॅन्कास्ट स्टील, एबीजी शिपयार्ड, एरा इन्फ्रा इत्यादी कंपन्यांची नावे आहेत. अशा कर्जबुडव्यांची संख्या १० हजारांवर आहे.

सरकारी बँका आघाडीवरकर्जे निर्लेखित करण्यात सरकारी बँका आघाडीवर आहेत. ते ७ लाख ३४ हजार काेटी रुपये एवढे आहे.एसबीआय : २ लाख काेटीपीएनबी : ६७ हजार काेटीबँक ऑफ बडाेदा : ६६ हजार कोटी

असे केले कर्जांचे निर्लेखनवर्ष     निर्लेखित कर्ज२०२१-२२     १.५७ लाख काेटी२०२०-२१     २.०२ लाख काेटी२०१९-२०     २.३४ लाख काेटी२०१८-१९     २.३६ लाख काेटी२०१७-१८     १.६१ लाख काेटी

टॅग्स :निर्मला सीतारामनसंसद