Join us

शेतीतून १० लाखांवर उत्पन्न ? - सावधान !, अर्जुन-कृष्णाचा असा घडला संवाद...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 8:01 AM

कृष्णा, भारताचे महालेखापरीक्षक व नियंत्रक यांनी अलिकडेच सादर केलेला शेती उत्पन्नाशी संबंधीत अहवाल काय आहे? 

अर्जुन: कृष्णा, भारताचे महालेखापरीक्षक व नियंत्रक यांनी अलिकडेच सादर केलेला शेती उत्पन्नाशी संबंधीत अहवाल काय आहे? कृष्ण: अर्जुना, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी शेती उत्पन्नाशी संबंधीत मुल्यांकनावर अहवाल तयार केला आहे. त्यात स्पष्टपणे नमूद केले होते, की ज्या शेतकऱ्यांचे शेतीपासूनचे उत्पन्न १० लाख रुपये प्रतिवर्ष मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना शेती उत्पन्नाच्या कठोर तपासणीला सामोरे जावे लागेल.अर्जुन:  शेती उत्पन्न म्हणजे काय? कृष्ण:  शेती उत्पन्नाचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे: अ) भारतातील व शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीतून मिळणारे कोणतेही भाडे किंवा महसूल.ब) अशा जमिनीतून शेती उत्पादनाच्या प्रक्रियेसह शेतीमधून मिळवलेले कोणतेही उत्पन्न. क) काही अटींच्या  अधीन असलेल्या फार्म हाऊसमधून मिळालेले उत्पन्न.ड) रोपवाटिकेमध्ये उगवलेली रोपे किंवा रोपे यांच्यापासून मिळणारे कोणतेही उत्पन्न. - आयकर कायद्याचे कलम १० (१) शेती उत्पन्नाला करातून सूट देते.अर्जुन: कृष्णा, जर करदात्याला शेतीपासून उत्पन्न मिळत असेल, तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? कृष्ण:  करदात्याने शेती उत्पन्न मिळवण्यासाठी केलेल्या खर्चाचा पुरावा असणारी कागदपत्रे, मिळालेल्या पिकाच्या विक्री पावत्या, शेतजमिनीवरील मालकी किंवा हक्काशी संबंधीत कागदपत्रे आणि  करदात्याचे बँक स्टेटमेंट योग्यरित्या सांभाळले पाहिजे.अर्जुन: लोकलेखा समितीने आपल्या अहवालात कोणते विशेष मुद्दे अधोरेखित केले आहेत? कृष्ण: कर संकलन विभागाने तपासणीची प्रकरणे निवडण्यासाठी कॉम्प्युटर एडेड स्क्रुटीनी सिलेक्शन सॉफ्टवेअर (CASS) विकसित केले आहे. CASS ही तपासणीच्या प्रकरणांची निवड करण्यासाठी केंद्रीकृत प्रणाली आहे आणि CASSमध्ये  मर्यादेपेक्षा जास्त (दहा लाख रु.) शेती उत्पन्न असलेल्या प्रकरणांच्या निवडीसाठी विशेष रचना करण्यात आली आहे. जेव्हा शेती उत्पन्न दहा लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हा वित्त मंत्रालय थेट करमुक्त दाव्यांची तपासणी करण्यासाठी आपली यंत्रणा विकसित करेल. त्यामुळे हिशेब व्यवस्थित ठेवावा.

टॅग्स :इन्कम टॅक्स