Join us  

सणासुदीत १० लाख नोकऱ्या; लहान शहरांतही रोजगाराच्या अनेक संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 8:56 AM

डिसेंबरपर्यंत रोजगार २५ टक्क्यांनी वाढणार, लहान शहरांतही अनेक संधी

लोकमत न्य़ूज नेटवर्क नवी दिल्ली : सणासुदीमुळे देशभर खरेदीचा उत्साह आहे. या हंगामात जोरदार कमाईसाठी कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. यामुळे २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत ६५ टक्के कंपन्या फ्रेशर्सना संधी देण्याच्या तयारी आहेत. यामुळे डिसेंबरपर्यंत देशात २५ टक्के हंगामी नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. यातून जवळपास १० लाख जणांना हाताला काम मिळेल. 

‘टीमलीज’ या जॉब कन्सल्टिंग फर्मच्या करिअर आऊटलुक अहवालानुसार मोठ्या शहरांसोबत २ टिअर व ३ टिअर शहरांध्येही दुसऱ्या सहामाहीत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

टुरिझममध्ये मोठी संधी पद    वाढीचे प्रमाणट्रॅव्हल कन्सल्टंट    २३% बिझनेस डेव्हलपमेंट    २१% इव्हेंट कॉर्डिनेटर    १९% फूड-बेवरेज असोसिएट    १७% ज्युनिअर शेफ    १७%

कोणते रोजगार कुठे मिळणार? nफूड अँड बेव्हरेज : बंगळुरु, दिल्ली आणि गुरुग्रामnट्रॅव्हल ॲडव्हायझर : अहमदाबाद, इंदूरnइव्हेंट कॉर्डिनेटर : हैदराबाद, चंडीगड आणि नागपूरnज्युनिअर शेफ : मुंबई, चेन्नई, चंडीगड nबिझनेस डेव्हलपमेंट : कोलकाता, पुणे आणि जयपूर 

ई-कॉमर्समध्ये सर्वाधिकसणासुदीच्या काळासाठी मीशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन तसेच मिंत्रा सारख्या ई-कॉमर्स मोठ्या प्रमाणात फ्रेशर्सची भरती करीत आहेत. मीशोसारखी कंपनी ५ लाख तर फ्लिपकार्ट एक लाख युवकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहेत. ॲमेझॉनमध्येही ८० हजार नोकऱ्या दिल्या जातील. सेल्स, मार्केटिंग आणि सप्लाय चेन या विभागात ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करणार आहेत. मिंत्रासारखी कंपनी ४५ टक्के महिलांना नियुक्त करणार आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत कंपनी २१ टक्के अधिक नोकऱ्या देणार आहे.  

 

टॅग्स :दिल्लीनोकरी