Join us

१० रुपयांच्या शेअरनं केलं मालामाल; १० हजार गुंतवले अन् मिळाले २.५० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 6:51 PM

या स्मॉल कॅप स्टॉकनं एकावेळी २५५ रुपये इतका उच्च दर गाठला आहे. स्टॉकमध्ये मागील २ दिवसांपासून ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई – थोडीशी रिस्क अन् दीर्घकाल गुंतवणूक केली तर शेअर मार्केटमधून तुम्ही कमी काळात श्रीमंत बनू शकतात. शेअर मार्केटमधील चढ-उतार यामुळे यात गुंतवणूक करण्यास अनेकांना भीती वाटते. परंतु अलीकडच्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. त्यात काहींना फटका बसतो तर काहींना भरभरुन फायदा होता. Everest Kanto स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठा फायदा झाल्याचं दिसून येते.

Everest Kanto स्टॉकनं २ वर्षाच्या कमी काळात गुंतवणूकदारांना जवळपास २५०० टक्के रिटर्न दिले आहेत. NSE वर या कंपनीचे शेअरचे २७ मार्च २०२० रोजी ९.९५ रुपये होते जे फेब्रुवारी २०२२ मध्ये २५३.८० रुपये झाले आहेत. या कंपनीनं २२ महिन्यात त्यांच्या गुंतवणूकदारांना २४५०.७५ टक्के रिटर्न दिले आहेत. त्याचा अर्थ असा की, २७ मार्च २०२० रोजी तुम्ही या शेअरमध्ये १० रुपये गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य २ लाख ५५ हजार इतके झाले असते.

या स्मॉल कॅप स्टॉकनं एकावेळी २५५ रुपये इतका उच्च दर गाठला आहे. स्टॉकमध्ये मागील २ दिवसांपासून ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या स्टॉकनं मागील १ वर्षात ३५४ टक्के रिटर्न दिले आहेत. या आठवड्यात हा स्टॉक १२.७ टक्क्यांनी वाढला आहे. दुपारच्या सत्रात कंपनीचा मार्केट कॅप २८६१.३० कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये तिमाही ११ प्रमोटर्सजवळ ७.५६ कोटी शेअर अथवा ६७.३९ टक्के भागीदारी होती. तर ४२ हजार ४१९ पब्लिक शेअरहोल्डर्सजवळ ३.६५ कोटी शेअर आहेत.

कंपनीची फायनान्सिअल परफॉर्मेंस कंपनीचे स्टॉक जबरदस्त राहिले आहेत. मार्च २०२१ मध्ये तिमाहीमध्ये कंपनीचे नेट प्रॉफिटमध्ये २९२१ टक्के वाढ झाली. मार्च २०२० मध्ये तिमाहीत कंपनीला २.९८ कोटी रुपये नेट प्रॉफिट झाला जो मागील वर्षी वाढून ९० कोटींवर पोहचला होता. Everest Kanto Cylinder मशीनरी आणि एक्विपमेंट सोडून फॅब्रिकेटेड मेटल प्रॉडक्ट्स बनवण्याचं काम करते. ही कंपनी हाय प्रेशर सीमलेस गॅस सिलेंडर आणि अन्य सिलेंडर, एक्विपमेंट, Appliances टॅक्स बनवण्याचं काम करते.

टॅग्स :शेअर बाजार