नवी दिल्ली : केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीआयसी) अवघ्या १६ दिवसांत १० हजार ७०० कोटी रुपयांचा जीएसटी आणि सीमा शुल्काचा परतावा दिला आहे. एवढ्या कमी काळात एवढ्या मोठ्या रकमेचा परतावा देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.
सीबीआयसीने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी ८ ते २३ एप्रिल दरम्यान ९८१८.१२ कोटी रुपयांचे जीएसटीचे दावे निकालात काढून त्यांचा परतावा दिला. तसेच सीमाशुल्काचा परतावा मागणारे १.८६ लाख दावेही या अधिकाऱ्यांनी निकालात काढत ९१५.५६ कोटी रुपये परत केले
आहे.
सध्या कोरोना व्हायरसच्या प्रसारास निर्बंध करण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे व्यापार व उद्योग ठप्प झाले आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी सीबीआयसीने परतावे अधिक वेगाने दिले असल्याचे या अधिकाºयाने सांगितले.
जीएसटी व सीमाशुल्क याचे १८ हजार कोटी रुपये परतावा मागणारे दावे करण्यात आले असून, हे सर्वच्या सर्व लवकरात लवकर निकाली काढले जातील, असे या अधिकाºयाने स्पष्ट केले.
१६ दिवसांत दिला १० हजार ७०० कोटींचा परतावा
सीमाशुल्काचा परतावा मागणारे १.८६ लाख दावेही या अधिकाऱ्यांनी निकालात काढत ९१५.५६ कोटी रुपये परत केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 03:41 AM2020-04-27T03:41:41+5:302020-04-27T03:42:20+5:30