Lokmat Money > बिझनेस न्यूज > बहिणींसाठी १० हजार कोटी खर्च, रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उलाढाल, आकर्षक भेटवस्तूंना मोठी मागणी, खरेदी टिपेला 

बहिणींसाठी १० हजार कोटी खर्च, रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उलाढाल, आकर्षक भेटवस्तूंना मोठी मागणी, खरेदी टिपेला 

व्यापाऱ्यांच्या संघटनेने दावा केला आहे की, या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारात १० कोटींपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी हा आकडा ७ हजार कोटींपर्यंत पोहोचला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:53 AM2023-08-30T11:53:52+5:302023-08-30T11:54:09+5:30

व्यापाऱ्यांच्या संघटनेने दावा केला आहे की, या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारात १० कोटींपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी हा आकडा ७ हजार कोटींपर्यंत पोहोचला होता. 

10 thousand crore spend for sisters, huge turnover on the occasion of Rakshabandhan, huge demand for attractive gifts, shopping tips | बहिणींसाठी १० हजार कोटी खर्च, रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उलाढाल, आकर्षक भेटवस्तूंना मोठी मागणी, खरेदी टिपेला 

बहिणींसाठी १० हजार कोटी खर्च, रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उलाढाल, आकर्षक भेटवस्तूंना मोठी मागणी, खरेदी टिपेला 

नवी दिल्ली : श्रावण उजाडताच देशभरात ठिकठिकाणी सणासुदींची लगबग सुरू होते. यासाठी घराघरात नियोजन सुरू होते, बाजारही सजू लागतात. परंतु, यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतित आहे. उत्पादनात घट झाल्याने महागाईने डोके वर काढले आहे. असे 
असतानाही यंदा रक्षाबंधनासाठी बाजार सजलेला दिसत आहे.

व्यापाऱ्यांच्या संघटनेने दावा केला आहे की, या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारात १० कोटींपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी हा आकडा ७ हजार कोटींपर्यंत पोहोचला होता. यंदा बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या राख्या आल्या आहेत. नोकरी-धंद्यानिमित्त दूर राहण्यास गेलेले तसेच सीमेवर तैनात असलेल्या लष्करी सेवेत असलेल्या जवानांना बहिणी राख्या पोस्टाने व कुरिअरने पाठवतात. तसेच एकमेकांना भेटवस्तूही पाठवल्या जातात. 

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, खेळणी, गॅझेट्सचे पर्याय 
रक्षाबंधनच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे गिफ्टचे पर्याय आले आहेत. 
लहान मुलांसाठी चॉकलेट, खेळणी आणि कपड्यांचे विविध पर्याय आहेत. 
आकर्षक घड्याळे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्वस्तातील गॅझेट्स यांचीही जोरदार चलती आहे. 
ऑफलाइन दुकानांप्रमाणेच यंदा ई-कॉमर्स कंपन्यांचीही विक्री जोरात आहे.

राख्यांनी सजला बाजार 
नागपूर    खादी राखी
जयपूर    सांगानेरी कला राखी
पुणे    बीज राखी
मध्य प्रदेश    उनी, बांस राखी 
आसाम    चायपत्ती राखी 
मुंबई    रेशीम राखी 
कानपूर    मोती राखी 
बिहार    मधुबनी, मैथिला कला राखी 
पाँडेचरी    सॉफ्ट स्टोन राखी 

चंद्रयान राखीची क्रेझ
विक्रम रोव्हर आणि रॉकेट असलेल्या विविध आकाराच्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या दरात पाच ते सात टक्क्यांची वाढ झाली आहे. दीडशे रुपये डझनपासून ते एक हजाराहून अधिक किमतीच्या राख्या उपलब्ध आहेत. 

चिनी राख्यांकडे पाठ
मागच्या वर्षीप्रमाणे चिनी राख्यांच्या तुलनेत भारतीय बनावटीच्या राख्यांचा खप अधिक होईल, असा अंदाज आहे. चिनी राख्यांना यंदाही तितकी मागणी नाही. 

Web Title: 10 thousand crore spend for sisters, huge turnover on the occasion of Rakshabandhan, huge demand for attractive gifts, shopping tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.