Join us

१० हजाराचे ३०० कोटी बनवले! 'हा' शेअर आहे खजिना! गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 9:23 PM

१९८५ मध्ये तुम्ही कोटक महिंद्रा बँकेत १० हजार रुपये गुंतवले केले असते तर आज तुम्ही ३०० कोटींचे मालक असता.

६ फेब्रुवारी २००३ पासून आता कोटक महिंद्रा बँकेचा शेअर २२,००० टक्क्यांनी वाढला आहे. आजच्याच दिवशी खासगी कर्ज देणाऱ्याला बँकिंग परवाना मिळाला होता. त्यावेळी बँकिंग परवाना मिळवणारी ती पहिली भारतीय NBFC कंपनी ठरली. त्यावेळी बँकेचे बाजार भांडवल ९४७ कोटी रुपये असेल. ती ३,५०,२६२ कोटी रुपये इतकी आहे. ACE इक्विटीच्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा फायनान्सची समायोजित शेअर किंमत ७.९९ रुपये झाली असती. आज ४ सप्टेंबर २०२३ रोजी बँकेचा शेअर १७६२ वर बंद झाला.

या मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिले 42 हजार टक्के रिटर्न्स...

दरम्यान, स्टॉक स्प्लिट, लाभांश, बोनस आणि हक्क ऑफर देखील होतात, ज्याचा शेअरच्या किमतीवर परिणाम होतो. ACE इक्विटीनुसार, कोटक बँकेने गुंतवणूकदारांना ४ वेळा बोनस शेअर्स दिले आहेत.

तुम्ही १९८५ मध्ये कोटक महिंद्रा बँकेत १०,००० रुपये गुंतवले असते तर आज तुम्ही ३०० कोटी रुपयांचे मालक असता. उदय कोटक यांनी काही दिवसांपूर्वीच बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. कोटक यांची स्वतःची संपत्ती १४.५ अब्ज डॉलर आहे. यातील बराचसा भाग त्यांच्या बँकेतील २६ टक्के भागभांडवलामुळे आहे.

कोटक यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, यात त्यांनी 'आम्ही आता एक आघाडीची बँक आणि वित्तीय संस्था आहोत, जी विश्वास आणि पारदर्शकतेच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे. आम्ही आमच्या भागधारकांसाठी मूल्य निर्माण केले आहे. आम्ही एक लाख थेट नोकऱ्या देत आहोत. आमच्या कंपनीत १९८५ साली केलेली १०,००० रुपयांची गुंतवणूक आज ३०० कोटी रुपये झाली आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची  गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारबँक