Lokmat Money > बिझनेस न्यूज > या वर्षी देशात 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडणार; घरपोच सेवा उपलब्ध होणार!

या वर्षी देशात 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडणार; घरपोच सेवा उपलब्ध होणार!

Post Offices : भारतीय पोस्ट यावर्षी 10,000 नवीन पोस्ट ऑफिस (Post Office) उघडण्याच्या योजनेवर काम करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:29 AM2022-08-28T10:29:41+5:302022-08-28T10:39:06+5:30

Post Offices : भारतीय पोस्ट यावर्षी 10,000 नवीन पोस्ट ऑफिस (Post Office) उघडण्याच्या योजनेवर काम करत आहे.

10 thousand new post offices will open in the country this year; Home service will be available! | या वर्षी देशात 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडणार; घरपोच सेवा उपलब्ध होणार!

या वर्षी देशात 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडणार; घरपोच सेवा उपलब्ध होणार!

नवी दिल्ली : भारतीय पोस्ट ऑफिस (India Post) आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी नवीन योजना तयार करत आहे. सरकारी सेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय पोस्ट योजना आणि तंत्रज्ञानावर काम करत आहे. तसेच, भारतीय पोस्ट यावर्षी 10,000 नवीन पोस्ट ऑफिस (Post Office) उघडण्याच्या योजनेवर काम करत आहे.

पोस्ट विभागाचे सचिव अमन शर्मा यांनी सीआयआय परिषदेत सांगितले की, तंत्रज्ञानाचा वापर करून पोस्ट ऑफिसच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने विभागाला 5,200 कोटी रुपये दिले आहेत. तसेच, आम्ही नुकतीच गुजरातमध्ये ड्रोनद्वारे डिलिव्हरी पूर्ण केली आहे. सरकारने आम्हाला 2012 मध्ये सुरू झालेला आयटी प्रकल्प पुढे नेण्यास सांगितले आहे. 

अमन शर्मा पुढे म्हणाले की, आता लोकांना पोस्ट ऑफिसमध्ये येण्याची गरज भासणार नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या दारात सेवा पोहोचवल्या जातील. दरम्यान, अमन शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, टपाल आणि विविध सरकारी सेवा लवकरच लोकांच्या दारात पोहोचवल्या जातील.  

याशिवाय, डिजिटल परिवर्तन हाच पुढे जाणारा मार्ग असल्याचे अमन शर्मा म्हणाले. त्यांनी सांगितले की, आयटीचा वापर करून नागरिकांना सेवा देण्यासाठी सरकार खूप उत्सुक आहे आणि त्यावर काम करत आहे. भारतीय पोस्टने महामारीच्या काळात 20,000 कोटी रुपयांहून अधिक घरपोच केले आहेत.

10,000 पोस्ट ऑफिस उघडण्याची परवानगी
सरकार आम्हाला आमची पोहोच वाढवण्यास आणि अधिक पोस्ट ऑफिस उघडण्यास सांगत आहे, असेही अमन शर्मा यांनी नमूद केले. ते म्हणाले, "आम्हाला आता आणखी 10,000 पोस्ट ऑफिस उघडण्याची परवानगी मिळाली आहे. लोकांना त्यांच्या घरापासून 5 किमीच्या परिघात बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरवल्या जाव्यात अशी सरकारची इच्छा आहे. चालू आर्थिक वर्षात 10,000 नवीन टपाल कार्यालये उघडली जातील, ज्यामुळे भारतातील एकूण पोस्ट ऑफिसची संख्या जवळपास 1.7 लाख होईल."

Web Title: 10 thousand new post offices will open in the country this year; Home service will be available!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.