मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदीला इतर बँकांना देण्यासाठी २००८ सालापासून बनावट हमीपत्रे देण्यात येत होती, अशी कबुली पीएनबीचा निवृत्त उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याने सीबीआयला दिली आहे. ही माहिती सीबीआयने बुधवारी न्यायालयाला दिली.
शेट्टीला शुक्रवारी सीबीआयने अटक केली. या घोटाळ्यात बँकेच्या फॉरेक्स विभागाचा मुख्य व्यवस्थापक बेचू तिवारी, एक व्यवस्थापक यशवंत जोशी, अधिकारी प्रफुल्ल सावंत यांना सोमवारी सीबीआयने अटक केली होती.
नीरव मोदीचे अलिबागजवळील फार्म हाउस बुधवारी जप्त केले. समुद्राला लागून असलेल्या आणि दीड एकरावर असलेल्या १२ हजार चौरस फूट बांधकामाच्या फार्म हाउसची किंमत २४ कोटी रुपये आहे. याखेरीज प्राप्तिकर विभागाने नीरव मोदीची १४१ बँक खाती गोठविली असून, त्यातील १४५ कोटी रुपयांची मालमत्ताही ताब्यात घेतली आहे. प्राप्तिकर विभागाने रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीचीही २१ बँक खाती गोठवली आहेत आणि त्याची सुमारे ६५ कोटींची मालमत्ता हस्तगत केली आहे.
शेट्टीचे कारनामे : सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, पीएनबीच्या फॉरेक्स विभागातील गोकुळनाथ शेट्टी व कारकून मनोज खरात यांनी २८० कोटींच्या व्यवहारासाठी मोदीला ८ बनावट हमीपत्रे ९, १० व १४ फेब्रुवारी २०१७ रोजी दिली.
१० वर्षांपासून सुरू होता नीरव मोदीचा महाघोटाळा
पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदीला इतर बँकांना देण्यासाठी २००८ सालापासून बनावट हमीपत्रे देण्यात येत होती, अशी कबुली पीएनबीचा निवृत्त उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याने सीबीआयला दिली आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 06:20 AM2018-02-22T06:20:44+5:302018-02-22T06:20:58+5:30