मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं वेतन गेल्या १0 वर्षांपासून १५ कोटी रुपये आहे. पुढील महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रिजची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून, अंबानी यांच्या वेतनावर बैठकीत कोणतीही चर्चा होणार नाही, असे संकेत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश डी. अंबानी यांना मिळणारा एकूण मोबदला १५ कोटी रुपये ठरवण्यात आलेला आहे. व्यवस्थापकीय पदावरील व्यक्तींचं वेतन मध्यम स्वरूपाचं असायला हवं, असं त्यांचं मत असून, त्यांचे स्वत:चं वेतन त्यानुसारच आहे. या मोबदल्यात वेतन, अनुषांगिक लाभ, भत्ते, कमिशन आणि निवृत्ती लाभ यांचा समावेश आहे. त्यांच्या शुद्ध मालमत्तेचा यात समावेश नाही. त्यांची निव्वळ मालमत्ता ४0 अब्ज डॉलर असून, ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.मुकेश अंबानी यांच्या तुलनेत भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील अन्य चेअरमन, सीईओ व इतर अधिकारी यांचे वेतन खूपच अधिक आहे. कोणाचे वेतन किती आहे, याचा हा गोषवारा :ए. एम. नाईक, समूह कार्यकारी चेअरमन, एलअँडटी - ४0.८७ कोटी रु. (वित्त वर्ष २0१७)वाय. सी. देवेश्वर, चेअरमन, आयटीसी - २१.१७ कोटी रु. (वित्त वर्ष २0१७)ग्यूंटर बश्चेक, सीईओ, टाटा मोटर्स - २२.५५ कोटी रु. (वित्त वर्ष २0१७)निखिल मेसवानी, ईडी, रिलायन्स इंडस्ट्रिज - १९.९९ कोटी (वित्त वर्ष २0१७)हितल मेसवानी, ईडी, रिलायन्स इंडस्ट्रिज- १९.९९ कोटी रु. (वित्त वर्ष २0१८)संजीव मेहता, एमडी, हिंदुस्तान युनिलिव्हर -१९.३७ कोटी रु. (वित्त वर्ष २0१८)पवन मुंजाळ, सीएमडी, हीरो मोटोकॉर्प -५९.६६ कोटी रु. (वित्त वर्ष २0१७)सुनील मित्तल, चेअरमन, भारती एअरटेल -३0.१४ कोटी रु. (वित्त वर्ष २0१७)राजीव बजाज, एमडी, बजाज ऑटो -२८.३२ कोटी (वित्त वर्ष २0१७)कुमारमंगलम बिर्ला, चेअरमन अल्ट्राटेक सिमेंट -१९.१३ कोटी रु. (वित्त वर्ष २0१७)
...म्हणून 10 वर्षांपासून मुकेश अंबानींचा पगारच वाढला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 8:30 AM