Join us  

एचडीएफसी बँक उघडणार १०० शाखा

By admin | Published: September 04, 2015 10:02 PM

एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने चालू वित्तीय वर्षात पूर्व भारतात आणखी १०० शाखा उघडण्याची योजना आखली आहे.

कोलकाता : एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने चालू वित्तीय वर्षात पूर्व भारतात आणखी १०० शाखा उघडण्याची योजना आखली आहे. बँकेचे बँकिंग प्रमुख अतुल बर्वे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ‘धनचायत’ चित्रपट जारी करण्यात आला. याप्रसंगी त्यांची विशेष उपस्थिती होती. ते म्हणाले की, सध्या पूर्व भारतात आमच्या ५०० शाखा आहेत. त्यात या नवीन १०० शाखांची भर पडल्याने या भागातील शाखांची संख्या ६०० होईल. १९५ ते २०० शाखा पश्चिम बंगालमध्ये असतील. जून २०१५ मधील आकडेवारीनुसार या बँकेच्या देशभरात सध्या ४०११ शाखा आहेत.