नवी दिल्ली : विदेशी गुंतवणूक आणखी वाढावी आणि अशा गुंतवणुकीसाठी उदार धोरण स्वीकारण्याचा एक भाग म्हणून खासगी बँकांतील विदेशी गुंतवणूक १०० टक्के करण्याचा विचार सरकार करीत आहे. सध्या ही मर्यादा ७४ टक्के आहे.
खासगी बँकांतील विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्याबाबतचा एक प्रस्ताव औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाने (डीआयपीपी) वित्तीय सेवा विभागाकडे विचारार्थ पाठविला
आहे.
सध्या खासगी बँकांत विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ७४ टक्के असून, त्यात ४९ टक्के थेट गुंतवणूक करता येते, तर त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करावयाची असेल तर विदेशी गुंतवणूक संवर्धन बोर्डाकडून परवानगी घ्यावी लागते.
आरोग्य क्षेत्राशी संबंधित उपकरणे, संरक्षण आणि अन्य उत्पादक क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीचे मापदंड सरकार शिथिल करीत आहे. चालू वित्तीय वर्षात एप्रिल-जून या तिमाहीत विदेशी गुंतवणूक ३१ टक्क्यांनी वाढून ९.५० अब्ज डॉलर झाली आहे.
छोट्या बँकांना होणारा फायदा
- सरकारच्या या पावलाने विद्यमान खासगी बँक, लघुवित्त बँकांना विदेशी बाजाराचा फायदा घेण्यास मदत होईल. त्यामुळे त्यांचे भांडवल वाढेल. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच १० लघुवित्त बँका आणि ११ अन्य बँकांना परवानगी दिली आहे.
- या क्षेत्रातील संवेदनशीलता ध्यानात घेऊन सरकार काळजीपूर्वक पावले उचलत आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेला विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ७४ टक्क्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी मिळाली आहे.
खासगी बँकांना देणार १००% एफडीआय
विदेशी गुंतवणूक आणखी वाढावी आणि अशा गुंतवणुकीसाठी उदार धोरण स्वीकारण्याचा एक भाग म्हणून खासगी बँकांतील विदेशी गुंतवणूक १०० टक्के करण्याचा विचार सरकार करीत आहे.
By admin | Published: September 18, 2015 12:33 AM2015-09-18T00:33:00+5:302015-09-18T00:33:00+5:30