Lokmat Money > बिझनेस न्यूज > १०० टक्क्यांनी वाढला मुकेश अंबानींनी विकत घेतलेल्या कंपनीचा शेअर, सातत्यानं लागतोय अप्पर सर्किट!

१०० टक्क्यांनी वाढला मुकेश अंबानींनी विकत घेतलेल्या कंपनीचा शेअर, सातत्यानं लागतोय अप्पर सर्किट!

लोटस चॉकलेट कंपनीचा एक शेअर सातत्यानं अप्पर सर्किटमध्ये असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 04:06 PM2023-01-16T16:06:51+5:302023-01-16T16:08:27+5:30

लोटस चॉकलेट कंपनीचा एक शेअर सातत्यानं अप्पर सर्किटमध्ये असतो.

100 percent surges of lotus chocolate share after mukesh ambani led reliance retail deal | १०० टक्क्यांनी वाढला मुकेश अंबानींनी विकत घेतलेल्या कंपनीचा शेअर, सातत्यानं लागतोय अप्पर सर्किट!

१०० टक्क्यांनी वाढला मुकेश अंबानींनी विकत घेतलेल्या कंपनीचा शेअर, सातत्यानं लागतोय अप्पर सर्किट!

मुंबई-

लोटस चॉकलेट कंपनीचा एक शेअर सातत्यानं अप्पर सर्किटमध्ये असतो. मुकेश अंबानींसोबत झालेल्या डीलनंतर कंपनीचा शेअर दररोज ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटला धडक देत आहे. लोटस चॉकलेटचे शेअर्स सोमवारी ५ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर्स आज २०९.९० रुपयांवर व्यवहार करत आहेत. 

दोन आठवड्यांपूर्वी मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने चॉकलेट कंपनी-लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअरसह मोठा करार जाहीर केला होता. तेव्हापासून लोटस चॉकलेट स्टॉकची जोरदार खरेदी झाली आहे. तेव्हापासून स्टॉक जवळजवळ ८० टक्क्यांनी वर चढला आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात हा स्टॉक १०० टक्क्यांनी वाढला आहे. 

स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट
शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शेअरने वरच्या सर्किटला धडक दिली आणि BSE निर्देशांकावर १९९.९५ रुपयांची पातळी गाठली होती. आज सोमवारी देखील स्टॉक ५ % च्या वरच्या सर्किटमध्ये आहे. २९ नोव्हेंबर रोजी बीएसई इंडेक्सवर लोटस चॉकलेटच्या शेअरची किंमत ११७ रुपयांच्या पातळीवर होती.

कराराचा तपशील जाणून घ्या
Reliance Consumer Products Limited (RCPL) आणि Reliance Retail Ventures Limited (RRVL) ने Lotus Chocolate मध्ये अतिरिक्त २६ टक्के स्टॉक घेण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. DAM कॅपिटलने एका नोटीसमध्ये म्हटले आहे की दोन कंपन्या लोटस चॉकलेटचे ३३.३८ लाख शेअर्स ओपन ऑफर अंतर्गत ११५.५० रुपये प्रति शेअर या निश्चित किंमतीवर विकत घेतील. ऑफरचा एकूण आकार, पूर्णपणे स्वीकारल्यास ३८.५६ कोटी रुपये इतका असेल. खुली ऑफर २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि ६ मार्चपर्यंत वैध राहणार आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने गेल्या आठवड्यात लोटसच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलपैकी ५१ टक्के अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती.

Web Title: 100 percent surges of lotus chocolate share after mukesh ambani led reliance retail deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.