वॉशिंग्टन : ब्रिक्स देशांकडून अमेरिकेच्या डॉलरच्या जागी स्वतंत्र चलन आणण्याचा प्रयत्न झाला तर या देशांना अमेरिकेकडून १०० टक्के कराचा सामना करावा लागेल, अशी धमकीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. असा प्रयत्न करणाऱ्यांना अमेरिकेतील बाजार सोडावा लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्हाला वचनबद्धता हवी आहे की, हे देश ब्रिक्सचे स्वतंत्र चलन सुरू करणार नाहीत तसेच डॉलरला पर्याय म्हणून इतर चलनाला स्वीकारणार नाहीत. अमेरिकेच्या सरकारने यातून प्रामुख्याने रशिया आणि चीनला कठोर संकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतालाही यामुळे मोठा फटका बसू शकतो.
ब्रिक्स देशांच्या संघटनेत भारत, रशिया, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इराण, इजिप्त, इथिओपिया आणि युनायटेड अरब एमीरेट्स हे देश सामील आहेत. २००९ मध्ये ब्रिक्स या संघटनेची सुरुवात झाली.
ब्रिक्स हा एकमेव आंतरराष्ट्रीय गट आहे ज्यात अमेरिका सहभागी झालेली नाही. (वृत्तसंस्था)
भारताची भूमिका काय?
nमागील काही वर्षांपासून या संघटनेतील रशिया आणि चीन हे दोन देश अमेरिकेच्या डॉलरला पर्याय शोधत आहेत.
nब्रिक्स देशांचे चलन सुरू करण्याच्या विचारात आहेत. भारत मात्र या प्रयत्नांपासून दूर आहे.
कुणी मांडला प्रस्ताव?
nदक्षिण आफ्रिकेत २०२३ मध्ये झालेल्या ब्रिक्सच्या शिखर परिषदेत अनेक देशांनी नव्या चलनाची व्यवहार्यता तपासण्याबाबत आग्रह धरला होता.
nब्राझिलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला डिसिल्व्हा यांनी याबाबत एक प्रस्तावही मांडला होता.