Join us

100 वर्षे जुन्या कंस्ट्रक्शन कंपनीला MSRDC ने दिली ₹1000 कोटींची ऑर्डर, शेअर्स 6% वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 6:27 PM

कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडकडून 1031.6 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

HCC Share Price: मुंबईस्थित 100 वर्षे जुन्या कंस्ट्रक्शन कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड (MSRDC) ने सोमवारी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (HCC ) ला सुमारे 1000 कोटी रुपयांहून अधिकची ऑर्डर दिली. ऑर्डर मिळताच कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीने स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC) ला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड (MSRDC) कडून 1031.6 कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. रायगडमध्ये 2 लेन पूल बांधण्यासाठी कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला येत्या 3 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाची एकूण लांबी 4.3 किमी आहे, ज्यामध्ये आगरदांडा बाजूला 45 मीटर पूल, डीग हाय बाजूला 145 मीटर पूल आणि 4,120 मीटर मुख्य पूल सामील आहे. हा पूल आगरदांडा जेट्टी आणि दिघी बंदराच्या किनारपट्टीवर आहे.

1 वर्षात 60 टक्के परतावा सोमवारी व्यवहारादरम्यान एचसीसीचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी वाढून 44.87 रुपयांवर पोहोचले. या शेअरने गेल्या 1 वर्षात सुमारे 60 टक्के आणि 6 महिन्यांत 21 टक्के परतावा दिला आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 57.50 आणि 52 आठवड्यांचा नीचांक 22.65 आहे.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारगुंतवणूक