Lokmat Money > बिझनेस न्यूज > फेसबुक-इन्स्टावर वस्तू विकणाऱ्यांची १० हजार कोटींची चोरी पकडली, आता आयकर विभागाकडून नोटीस

फेसबुक-इन्स्टावर वस्तू विकणाऱ्यांची १० हजार कोटींची चोरी पकडली, आता आयकर विभागाकडून नोटीस

तीन वर्षांच्या कालावधीत ई-टेलर्सद्वारे सुमारे १० हजार कोटी रुपयांची करचोरी आढळून आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 02:23 PM2023-11-22T14:23:04+5:302023-11-22T14:24:22+5:30

तीन वर्षांच्या कालावधीत ई-टेलर्सद्वारे सुमारे १० हजार कोटी रुपयांची करचोरी आढळून आलीये.

10000 crore theft of goods sold on Facebook Instagram caught now notice from income tax department know details | फेसबुक-इन्स्टावर वस्तू विकणाऱ्यांची १० हजार कोटींची चोरी पकडली, आता आयकर विभागाकडून नोटीस

फेसबुक-इन्स्टावर वस्तू विकणाऱ्यांची १० हजार कोटींची चोरी पकडली, आता आयकर विभागाकडून नोटीस

इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्यासोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे वस्तूंची विक्री करणाऱ्यांकडून कर चोरी होत असल्याचा आयकर विभागानं छडा लावला आहे. तीन वर्षांच्या कालावधीत ई-टेलर्सद्वारे सुमारे १० हजार कोटी रुपयांची करचोरी आढळून आलीये. विभागानं संपूर्ण भारतातील ४५ ब्रँडना नोटिसा पाठवल्या आहेत आणि अनेकांना नोटिसा पाठवल्या जाणार असल्याची माहिती आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार हे ब्रँड एकतर कर भरत नव्हते किंवा कमी कर भरत होते.

१० हजार कोटींची कर चोरी
मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांशिवाय आम्ही इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील दुकानांवरही लक्ष ठेवून आहोत. आम्ही जवळपास १० हजार कोटी रुपयांच्या कर चोरीची माहिती मिळवलीये. या नोटिसा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवडा आणि १५ नोव्हेंबर दरम्यान पाठवण्यात आल्यात. या २०२० ते २०२२ या असेसमेंट इयरसाठी असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ईटीला दिली.

या सामानांची विक्री
आम्ही जवळपास अशा ४५ ई टेलर्सना नोटिसा पाठवल्या आहेत आणि येत्या काही दिवसांत आणखी नोटिसा पाठवल्या जातील. यात कोणती मोठी ई कॉमर्स कंपनी नाही. ४५ पैकी १७ कपड्यांची विक्री करतात, ११ ज्वेलरी आणि ६ जण शूज आणि बॅग्जची विक्री करतात. तर काही फॅशन प्रोडक्ट आणि काही होम डेकोर आणि फर्निशिंगची विक्री करतात. यामध्ये काही प्रमुख रिटेलर्सचाही समावेश आहे. जो मोठ्या प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. यापैकी काही विक्रेते आपले प्रोडक्ट्स परदेशातून पाठवत असल्याचं अधिकाऱ्यानं म्हटलं.

टर्नओव्हर ११० कोटी, उत्पन्न दाखवलं २ कोटी
एका उदाहरणाचा दाखला देत अधिकाऱ्यानं सांगितलं की, मुंबईतील तीन साडी ई-टेलर आयकर विभागाच्या रडारखाली आले जेव्हा त्यांनी स्टार-स्टडेड फॅशन शो स्पॉन्सर केला. अधिकाऱ्यानं पुढे सांगितले की, ते फक्त एक लहान दुकान आणि गोदामांसह इंस्टाग्रामद्वारे आपल्या प्रोजक्टची विक्री करत होते. त्यांची उलाढाल ११० कोटी रुपये होती. परंतु त्यांनी २ कोटी रुपयांचं उत्पन्न दाखल रिटर्न फाईल केला होता.

Web Title: 10000 crore theft of goods sold on Facebook Instagram caught now notice from income tax department know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.