Join us

भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 9:39 AM

ड्रोन क्षेत्रासाठी उत्पादन बंधित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : ड्रोन उत्पादन क्षेत्रात आगामी तीन वर्षांत ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल, तसेच त्यातून १० हजार नवे रोजगार निर्माण होतील, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले आहे. 

शिंदे यांनी सांगितले की, ड्रोन क्षेत्रासाठी उत्पादन बंधित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली असून २०२६ पर्यंत त्यातून ड्रोन उत्पादन क्षेत्र ३ वर्षांत ९०० कोटी रुपयांचा व्यवसाय करेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :केंद्र सरकारज्योतिरादित्य शिंदे