Lokmat Money > बिझनेस न्यूज > १०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिसा; दग्गज विमान कंपन्यांचा समावेश

१०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिसा; दग्गज विमान कंपन्यांचा समावेश

वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने भारतात संचालन करणाऱ्या १० दिवेशी एअरलाइन्सना 'कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यांच्यावर तब्बल १०,५३३ कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:24 PM2024-08-07T13:24:00+5:302024-08-07T13:24:16+5:30

वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने भारतात संचालन करणाऱ्या १० दिवेशी एअरलाइन्सना 'कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यांच्यावर तब्बल १०,५३३ कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे.

10,533 crore tax evasion 10 Notices to airlines Major airlines quatar thai etihad included | १०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिसा; दग्गज विमान कंपन्यांचा समावेश

१०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिसा; दग्गज विमान कंपन्यांचा समावेश

वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने भारतात संचालन करणाऱ्या १० दिवेशी एअरलाइन्सना 'कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यांच्यावर तब्बल १०,५३३ कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे. आमिरात एअरलाइन्सवर सर्वाधिक ७,५५० कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे.
वर्ष २०२३ मध्ये या कंपन्यांची चौकशी झाली होती. आता त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या कंपन्यांच्या विमानांची देखभाल, वैमानिक वेतन आणि भाडे यांसारख्या सेवा विदेशातील मुख्यालयांतून प्रदान केल्या जातात. सेवा एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला दिल्या जात असल्याने त्या करपात्र आहेत.

किती कोटी बुडविले?

  • आमिरात एअरलाइन्स ७,५५०
  • एतिहाद एअरवेज १,६६०
  • सौदी अरब एअरलाइन्स ६१२
  • एअर अरेबिया ४५५
  • ओमान एअरलाइन्स ७१
  • थाई एअरवेज ६०
  • कतार एअरवेज ५३
  • सिंगापूर एअरलाइन्स ४० 
  • ब्रिटिश एअरवेज ३३
     

(आकडेवारी कोटी रुपयांमध्ये)

Web Title: 10,533 crore tax evasion 10 Notices to airlines Major airlines quatar thai etihad included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.