Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास

बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास

एसबीआय शाखेने प्राथमिक चौकशीनंतर नाणी मोजण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही बाब उघडकीस आली, ज्यात बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत तफावत असल्याचे दिसून आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:17 PM2022-04-20T12:17:35+5:302022-04-20T12:18:28+5:30

एसबीआय शाखेने प्राथमिक चौकशीनंतर नाणी मोजण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही बाब उघडकीस आली, ज्यात बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत तफावत असल्याचे दिसून आले.

11 crore coin disappears from bank vault in Rajasthan, Investigation to CBI | बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास

बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास


नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेतून तब्बल ११ कोटी रुपयांची नाणी गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी येथील एसबीआय बँकेच्या शाखेत घडला आहे. यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असल्याची माहिती सोमवारी अधिकाऱ्यांनी दिली.

एसबीआय शाखेने प्राथमिक चौकशीनंतर नाणी मोजण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही बाब उघडकीस आली, ज्यात बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत तफावत असल्याचे दिसून आले. बँकेच्या शाखेतील पुस्तकांनुसार १३ कोटी रुपयांहून अधिक किमतीची नाणी मोजण्यासाठी जयपूरमधील एका खासगी कंपनीची मदत घेण्यात आली होती. यानंतर बँकेतून ११ कोटींहून अधिक किमतीची नाणी गहाळ झाल्याचे मोजणीत उघड झाले. सुमारे दोन कोटी रुपये असलेल्या केवळ तीन हजार नाण्यांच्या पिशव्यांचा हिशेब लावण्यात यश आले.

धमकावल्याचा आरोप
एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, खासगी मोजणी विक्रेत्याच्या कर्मचाऱ्यांना १० ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ते राहत असलेल्या गेस्ट हाउसमध्ये जात नाणी मोजू नका असे धमकावण्यात आले होते, असे सांगण्यात आले आहे.
 

Web Title: 11 crore coin disappears from bank vault in Rajasthan, Investigation to CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.