मुंबई - यावर्षी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अनेक कंपन्यांच्या शेअरमधून जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत. केमिकल सेक्टरमधील अशाच एका कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या ३ वर्षांमध्ये एवढा रिटर्न मिळाला आहे की, या शेअरमध्ये गुंतवलेले १ लाख रुपये ११ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
बीएसईमध्ये लिस्टेट असलेली केमिकल कंपनी दीपक नायट्राइटचा शेअर गेल्या ३ वर्षांमध्ये ९८४ टक्क्यांपेक्षा अधिक वधारला आहे. या आठवड्यामध्ये शुक्रवारी अखेरच्या व्यावसायिक दिवशी कंपनीचे शेअर २ हजार ३३५ पर्यंत पोहोचले आहेत. तर २४ डिसेंबर २०१८ रोजी या शेअरकचा भाव २१२.९० रुपये एवढा होता.
अशाप्रकारे कुठल्याही व्यक्तीने २०१८ मध्ये दीपक नायट्राइटच्या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर त्याला या भावानुसार १० लाख ९६ हजार म्हणजेच सुमारे ११ लाख रुपये मिळतील. या शेअर भावामुळे कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन ३१ हजार ५४५ कोटी रुपये एवढे झाले आहे.
जर २०२१ चा विचार केला तर वर्षभरात कंपनीचा शेअर १४४.९८ टक्क्यांनी वधारला आहे. अशाप्रकारे शेअर बाजारामध्ये असलेल्या तेजीचा परिणाम कंपनीच्या शेअरवर स्पष्टपणे दिसत आहे. तर १९ ऑक्टोबर २०२१ रोजी कंपनीच्या शेअरचा भाव ३ हजार २० रुपये या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. तेव्हापासून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांकडून नफावसुली केली जात असल्याचे दिसत आहे.
लार्ज कॅप कंपनी दीपक नायट्राइटच्या शेअरची तुलना जर या सेगमेंटच्या अन्य कंपन्यांशी केल्यास याबाबतीतही या कंपनीच्या शेअरची कामगिरी उत्तम झाली आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये आरती इंडस्ट्रीजचा शेअर १६६ टक्के, टाटा केमिकल्सचा शेअर १८२ टक्के आणि एसआरएफ लिमिटेटचा शेअर ४८७ टक्क्यांनी वाझला आहे.
दीपक नायड्राइटच्या शेअरचे प्रदर्शन कंपनीच्या ताळेबंदाशीही मिळतेजुळते आहे. जुलै-सप्टेंबर २०२१च्या तिमाहीमध्ये कंपनीचा लाभ ९५६ टक्क्यांनी वाढून १३१.५२ कोटी रुपये राहिला आहे. जर २०२०च्या याच तिमाहीमध्ये कंपनीला १२.९७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.