Join us

दर तासाला ११ लोक करतात बँकेबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 5:14 AM

बड्या उद्योगपतींचे बँकांमधील अब्जावधी रुपयांचे कर्ज घोटाळे सातत्याने समोर येत असतानाच बँकांकडून सामान्य ग्राहकांना मात्र प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. देशात दर तासाला सरासरी ११ लोक आपल्या बँकेबाबत तक्रार करीत असतात, असे आढळून आले आहे.

बंगळुरू - बड्या उद्योगपतींचे बँकांमधील अब्जावधी रुपयांचे कर्ज घोटाळे सातत्याने समोर येत असतानाच बँकांकडून सामान्य ग्राहकांना मात्र प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. देशात दर तासाला सरासरी ११ लोक आपल्या बँकेबाबत तक्रार करीत असतात, असे आढळून आले आहे.रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल २0११ ते ३१ मार्च २0१७ या काळात बँकांविरुद्ध ग्राहकांनी तब्बल ४ लाख तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार, दर तासाला सरासरी ११ तक्रारी होतात. याशिवाय ३१ मार्च २0१८पर्यंत आणखी १ लाख तक्रारी आलेल्या असू शकतात. त्यांची आकडेवारी अजून जाहीर झालेली नाही.बँकांविरुद्ध मुद्दाम पेमेंट न स्वीकारण्यापासून (खात्यावर वेळेवर पैसे जमा न केल्यास ग्राहकांना दंड बसून बँकांचा फायदा होतो.) ते खाते बंद करण्यास नकार देताना योग्य प्रक्रियेचा अवलंब न करण्यापर्यंत विविध स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३५ ते ३८ टक्के तक्रारी बँकांकडून वचने न पाळल्याच्या तसेच उचित कारभार न केल्याच्या आहेत. २0 टक्के तक्रारी एटीएम, डेबिट व के्रडिट कार्डाशी संबंधित आहेत, तर ८ टक्के तक्रारी निवृत्तिवेतनाशी संबंधित आहेत. निवृत्तिवेतनाच्या बहुतांश तक्रारी सरकारी बँकांच्या विरोधातील आहेत. या बँका निवृत्तांना वेळेवर निवृत्तिवेतन देत नाहीत. (वृत्तसंस्था)0.२ टक्का निर्णयच ग्राहकांच्या बाजूनेरिझर्व्ह बँकेने म्हटले की, गेल्या काही वर्षांत बँकांविषयीच्या तक्रारींत वाढ झाल्याचे दिसते. अशा तक्रारी २0१६-१७मध्ये २७ टक्क्यांनी वाढून १.३ लाख झाल्या.सिनर्जी फाउंडेशनचे टॉबी सायमन यांनी सांगितले, तक्रारी वाढल्या असल्या तरी तक्रारी करणाऱ्या ग्राहकांना या प्रक्रियेतून फार काही हाती लागत नाही. केवळ 0.२ टक्का तक्रारींवर ग्राहकांच्या बाजूने निर्णय होतो.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकबातम्या