Lokmat Money > बिझनेस न्यूज > Whatsapp वर मिळणार LIC च्या ११ सेवा, जाणून घ्या कसं कराल रजिस्ट्रेशन

Whatsapp वर मिळणार LIC च्या ११ सेवा, जाणून घ्या कसं कराल रजिस्ट्रेशन

व्हॉट्सॲप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना 11 सुविधांचा लाभ घरात बसून मिळू शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:41 PM2022-12-02T21:41:21+5:302022-12-02T21:42:39+5:30

व्हॉट्सॲप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना 11 सुविधांचा लाभ घरात बसून मिळू शकेल.

11 services of LIC will be available on Whatsapp know how to register you will able to do things sitting at home | Whatsapp वर मिळणार LIC च्या ११ सेवा, जाणून घ्या कसं कराल रजिस्ट्रेशन

Whatsapp वर मिळणार LIC च्या ११ सेवा, जाणून घ्या कसं कराल रजिस्ट्रेशन

भारतीय आयुर्विमा महामंडळाने त्यांच्या नोंदणीकृत LIC पॉलिसीधारकांसाठी निवडक इंटरॲक्टिव्ह WhatsApp सेवा सुरू केल्या आहेत. विमा क्षेत्रातील दिग्गज एलआयसीने शुक्रवारी घोषणा केली की व्हॉट्सॲप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना 11 सुविधांचा लाभ घरात बसून मिळू शकेल.

ज्या पॉलिसीधारकांनी एलआयसी पोर्टलवर आपली पॉलिसी नोंदणी केली आहे त्यांनी व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सॲपवरून मोबाईल क्रमांक 8976862090 वर 'HI' पाठवावा. त्यानंतर ग्राहक 11 पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेऊ शकतील. जेव्हा ग्राहक व्हॉट्सअॅपवर 'HI' पाठवतो तेव्हा तो LIC च्या WhatsApp शी कनेक्ट होईल आणि स्क्रीनवर सेवांची यादी दिसेल. सूचीतील तुमच्या गरजेनुसार त्यावर क्लिक करून तुम्ही सेवेचा लाभ घेऊ शकाल.

कोणत्यासेवामिळणार?

  • देय प्रीमियम
  • बोनसची माहिती
  • धोरणांची स्थिती
  • कर्जांच्या पात्रतेचे कोटेशन
  • कार्जाच्या परतफेडीचे कोटेशन
  • कर्जाचे देय व्याज
  • प्रीमियम पेमेंट प्रमाणपत्र
  • युलिप - युनिट्सचे तपशील
  • lic सेवा लिंक
  • सेवा निवडणे/निवड रद्द करणे
  • संभाषण थांबवणे.


कसंकरालरजिस्टर?

सर्वप्रथम www.licindia.in या संकेतस्थळावर जाऊन ग्राहक पोर्टलवर क्लिक करा.

जर तुम्ही या पूर्वी रजिस्टर केलं नसेल तर नवीन वापरकर्तेवर क्लिक करा.

विचारल्याप्रमाणे खालील तपशील प्रविष्ट करा.

www.licindia.in ला भेट द्या, 'नवीन वापरकर्ता' टॅबवर क्लिक करा, तुमचा युझर आयडी आणि पासवर्ड निवडा आणि सर्व आवश्यक माहिती प्रदान करा. तुम्ही आता नोंदणीकृत पोर्टल युझर आहात.

'ई-सेवा' टॅबवर क्लिक करा आणि तुम्ही तयार केलेला युझर आयडी वापरून लॉग इन करा.

त्यानंतर दिलेला फॉर्म भरून ई-सेवा वापरण्यासाठी तुमच्या पॉलिसींची नोंदणी करा.

आता फॉर्म प्रिंट करा आणि त्यावर स्वाक्षरी करा. फॉर्मची स्कॅन केलेली इमेज अपलोड करा.

पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्टची स्कॅन कॉपी अपलोड करा.

एलआयसी कार्यालयांकडून पडताळणी केल्यानंतर तुम्हाला एक ई-मेल आणि एसएमएस पाठवला जाईल. ज्यामध्ये आता तुम्ही आमच्या ई-सेवांचा लाभ घेण्यासाठी तयार आहात, असे लिहिलेले असेल.

आता सबमिट बटणावर क्लिक करा.

तुमच्या आवडीचा यूजर आयडी आणि पासवर्ड निवडा आणि सबमिट करा.

लॉगिन करा आणि 'बेसिक सर्व्हिसेस'वर क्लिक करा त्यानंतर 'पॉलिसी जोडा' पर्याय निवडा.

आता तुमच्या सर्व पॉलिसींची नोंदणी करा.

Web Title: 11 services of LIC will be available on Whatsapp know how to register you will able to do things sitting at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.