Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयकर मोहिमेनंतर ११.१७ लाख रिटर्न्स

आयकर मोहिमेनंतर ११.१७ लाख रिटर्न्स

आर्थिक वर्ष २०१४-२०१५ साठी ११ लाखांपेक्षा जास्त करदात्यांनी त्यांचे आयकर विवरण (रिटर्न्स) दाखल केले आहे. आयकर विवरण पत्र दाखल करणे बंधनकारक असतानाही ते कोणी दाखल केले नाही

By admin | Published: February 1, 2016 02:21 AM2016-02-01T02:21:38+5:302016-02-01T02:21:38+5:30

आर्थिक वर्ष २०१४-२०१५ साठी ११ लाखांपेक्षा जास्त करदात्यांनी त्यांचे आयकर विवरण (रिटर्न्स) दाखल केले आहे. आयकर विवरण पत्र दाखल करणे बंधनकारक असतानाही ते कोणी दाखल केले नाही

11.17 lakh returns after the Income Tax Campaign | आयकर मोहिमेनंतर ११.१७ लाख रिटर्न्स

आयकर मोहिमेनंतर ११.१७ लाख रिटर्न्स

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१४-२०१५ साठी ११ लाखांपेक्षा जास्त करदात्यांनी त्यांचे आयकर विवरण (रिटर्न्स) दाखल केले आहे. आयकर विवरण पत्र दाखल करणे बंधनकारक असतानाही ते कोणी दाखल केले नाही हे शोधण्यासाठी आयकर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये हे करदाते समोर आले.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्याने ५८.९५ लाख करदाते शोधले असून त्यापैकी ११.१७ लाख करदात्यांनी हे विवरण पत्र दाखल केले आहे.
या करदात्यांकडून किती महसूल मिळाला; हे मात्र सांगण्यात आलेले नाही. हे करदाते विवरण पत्र भरायला एक तर विसरले किंवा त्यांनी ते
टाळले.
हे चुकार करदाते शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.

Web Title: 11.17 lakh returns after the Income Tax Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.