Join us

एका खोलीतून चालवल्या ११४ कंपन्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:44 AM

एका खोलीतून तब्बल ११४ शेल कंपन्या चालविण्यात येत होत्या. तेही फक्त २५ कर्मचाऱ्यांच्या बळावर.

हैदराबाद : कंपनी निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबादेतील एका छोट्या खोलीतील एका कार्यालयाची तपासणी केली तेव्हा अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. या एका खोलीतून तब्बल ११४ शेल कंपन्या चालविण्यात येत होत्या. तेही फक्त २५ कर्मचाºयांच्या बळावर! यातील बहुतांश कंपन्या सत्यम घोटाळ्यातील आरोपी बी. रामलिंगा राजू याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या आहेत.एका तपास अधिकाºयाने सांगितले की, जुबिली हिल्स परिसरातील फॉर्च्युन मोनार्क मॉलमधील अत्यंत छोट्याशा खोलीतून हे सगळे उद्योग केले जात होते. एसआरएसआर अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीचे ते नोंदणीकृत कार्यालय आहे. शेल कंपन्यांविरोधातील मोहिमेत सध्या कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयांचा तपास सुरु आहे. तपासात या एकाच ठिकाणाहून ११४ कंपन्या चालविण्यात येत असल्याचे समोर आले. कंपनी कायद्याच्या नियमानुसार एका व्यक्तीला २० नोंदणीकृत कंपन्यांचे सदस्य होता येते. या प्रकरणात या नियमाचा भंग झाला आहे का, याचा तपास केला जाईल.

टॅग्स :व्यवसाय