नवी दिल्ली : भारतातील दूरसंचार ग्राहकांची संख्या फेब्रुवारीत १.१७ टक्क्यांनी वाढून १.१८ अब्जांचा आकडा पार करून गेली आहे. लँडलाइन आणि मोबाइल अशा दोन्ही ग्राहकांचा त्यात समावेश आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ही माहिती दिली आहे.
फेब्रुवारीत १३.७५ दशलक्ष नवे ग्राहक दूरसंचार कंपन्यांना मिळाले. एके काळी लोकप्रिय असलेल्या लँडलाइन फोनची मागणी मात्र आता प्रचंड प्रमाणात घटली आहे. स्वस्त मोबाइल हँडसेट, कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे मोफत सेवा आणि स्वस्त दर यांचे पेव फुटल्याचा फटका लँडलाइनला बसला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नवागत जिओ, तसेच भारती एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्या आकर्षक आॅफर्स ग्राहकांना देत आहेत. जानेवारी २0१७ च्या अखेरीस १,१७४.८0 दशलक्ष दूरसंचार ग्राहक देशात होते. फेब्रुवारी २0१७ च्या अखेरीस हा आकडा १,१८८.५ दशलक्षांवर गेला. ग्राहकसंख्येत १.१७ टक्क्यांची वाढ झाल्याचे ही आकडेवारी दर्शविते, असे ट्रायने म्हटले आहे.
ट्रायच्या आकडेवाडीनुसार शहरी भागातील जोडण्या फेब्रुवारी अखेरी १.६ टक्के वाढीसह ६९२.१५ दशलक्षांवर गेल्या आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकसंख्या तुलनेने कमी 0.५६ टक्क्याने वाढून ४९६.३९ दशलक्षांवर गेली. भारतीय दूरसंचार बाजार जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे.
महसूल ४ लाख कोटींवर जाणार
भारतीय दूरसंचार कंपन्यांचा पारंपरिक तंत्रज्ञानाच्या सेवेद्वारे मिळणारा महसूल २0२६ पर्यंत ४ लाख कोटी रुपयांवर जाईल, असे स्विडिश दूरसंचार गीअर उत्पादक कंपनी एरिक्सनने म्हटले आहे.
अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येतील वाढीचा
लाभ कंपन्यांना मिळूनही व्यवसायवृद्धी होईल, असे एरिक्सनने म्हटले आहे.
५जी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कंपन्यांच्या महसूल आणखी २0 टक्क्यांनी वाढेल, असेही एरिक्सनने म्हटले आहे.
१.१८ अब्ज मोबाइलधारक
भारतातील दूरसंचार ग्राहकांची संख्या फेब्रुवारीत १.१७ टक्क्यांनी वाढून १.१८ अब्जांचा आकडा पार करून गेली आहे. लँडलाइन आणि मोबाइल अशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2017 01:28 AM2017-05-01T01:28:37+5:302017-05-01T01:28:37+5:30