Lokmat Money > बिझनेस न्यूज > हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST

हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST

या निर्णयामुळे हॉस्टेल आणि पीजीमध्ये राहणाऱ्यांना झटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 07:51 PM2023-07-30T19:51:44+5:302023-07-30T19:52:27+5:30

या निर्णयामुळे हॉस्टेल आणि पीजीमध्ये राहणाऱ्यांना झटका बसला आहे.

12 Percent Gst On Hostel And Pg , know the detail | हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST

हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST

तुम्ही हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आता पीजी आणि हॉस्टेलच्या भाड्यासाठी जास्तीचे शुल्क भरावे लागणार आहे. अथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग्स (AAR) ने दोन वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करताना हॉस्टेल्स आणि PG च्या किरायावर 12 टक्के GST (GST) लावण्याचे आदेश दिले आहेत. 

एएआरने हा निर्णय दिला
एएआरच्या बंगळुरू खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, कोणतेही निवासी फ्लॅट किंवा घर आणि हॉस्टेल किंवा पीजी एक समान नसतात. त्यामुळे हॉस्टेल आणि पीजी सारख्या व्यावसायिक क्रियाकलाप करणाऱ्या ठिकाणांना 12 टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरणे बंधनकारक आहे. त्यांना जीएसटीमधून सूट देऊ नये. 

श्रीसाई लक्झरी स्टेज एलएलपीच्या अर्जावर एएआरने म्हटले की, 17 जुलै 2022 पर्यंत बंगळुरुमधील हॉटेल्स, कॅम्पसाइट्स किंवा क्लबना 1,000 रुपयांपर्यंतच्या शुल्कावर जीएसटीमधून सूट देण्यात आली होती, परंतु ही सूट वसतिगृहे किंवा पीजी जीएसटीसाठी पात्र नाहीत. यासोबतच, खंडपीठाने सांगितले की, निवासी मालमत्ता आणि पीजी हॉस्टेल एकसारखे नाहीत. अशा स्थितीत एकच नियम दोघांनाही लागू होऊ शकत नाही. या निर्णयात असेही म्हटले आहे की, जर कोणी निवासी मालमत्ता गेस्ट हाऊस किंवा लॉज म्हणून वापरत असेल तर ती जीएसटीच्या कक्षेत येणार नाही.

Web Title: 12 Percent Gst On Hostel And Pg , know the detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.