हैदराबाद : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) शेअर बाजारात आता १२ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक वाढविणार आहे. कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली. आपल्या गुंतवणूकयोग्य रकमेतून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना बंडारू दत्तात्रेय म्हणाले की, केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) बैठक २२ जुलैपूर्वी होणार आहे. ईटीएफमधील गुंतवणुकीबाबत आम्ही यावेळी निर्णय घेऊ शकतो. मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यांच्याशी चर्चा सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुंतवणूक निश्चितच वाढणार आहे. अर्थ मंत्रालयाने ५ ते १५ टक्के गुंतवणुकीला परवानगी दिली आहे, असेही बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ईपीएफओने ३० जूनपर्यंत ईटीएफ व एनएसई निफ्टी यात ७४६८ कोटींची गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत या गुंतवणुकीचे मूल्य ७.४५ टक्क्यांनी वाढून ८,०२४ कोटी रुपये झाले आहे. (वृत्तसंस्था)
>ईपीएफच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी गुंतवणूकयोग्य रक्कम 1.35 लाख कोेटी रुपये असेल.
ईपीएफची बाजारात १२ टक्के गुंतवणूक ?
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) शेअर बाजारात आता १२ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक वाढविणार आहे.
By admin | Published: July 18, 2016 05:56 AM2016-07-18T05:56:51+5:302016-07-18T05:56:51+5:30