योगेश बिडवई, मुंबई
कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ५०-५० टक्के खरेदी करण्याचे ठरविले असले तरी किलोमागे किमान १२ रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. किमान एवढा भाव मिळाला तरच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राला तसा प्रस्ताव पाठविणे अपेक्षित आहे.
आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये भाव भडकण्याच्या शक्यतेने पावसाळ््यापूर्वी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेडने ८५० रुपये क्विंटलने शेतकऱ्यांकडून तब्बल सात हजार मेट्रीक टन कांद्याची खरेदी केली होती. तो माल लासलगाव व पिंपळगावच्या गोदामात काळजीपूर्वक साठवण्यात आला आहे. सर्व खर्च गृहित धरुन या मालाचे १० दिवसांपूर्वी नाफेडने काढलेले मूल्य १,५०० रुपये आहे. नाफेडचे दर प्रमाण मानून शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेल्या कांद्यावरील
सर्व खर्च लक्षात घेता त्यांनाही क्विंटलमागे आता किमान १,२५० रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे,
तरच त्याचा खर्च निघू शकेल,
असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
राज्य सरकारला प्रस्ताव पाठविताना बाजार हस्तक्षेप योजना किंवा किंमत स्थिरीकरण निधीतून कांदा खरेदी करायचा, याबाबत केंद्राला स्पष्टपणे सूचित करावे लागणार आहे. बाजार समित्यांकडून उत्पादित मालाबाबत माहिती घ्यावी लागेल. तसेच ‘सरकारी कांदा खरेदी’साठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यास केंद्र सरकारला सांगावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे कांदा खरेदी केवळ नाशिक जिल्हा की संपूर्ण राज्यात करणार, याचाही निर्णय तातडीने घ्यावा लागेल.
कांद्याला मिळावा १२ रुपये भाव!
कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ५०-५० टक्के खरेदी करण्याचे ठरविले असले तरी किलोमागे किमान १२ रुपये भाव मिळावा
By admin | Published: August 12, 2016 03:46 AM2016-08-12T03:46:45+5:302016-08-12T03:46:45+5:30