Lokmat Money > बिझनेस न्यूज > डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

या इंधनांच्या किरकोळ विक्रीच्या किमती मार्च 2024 पासून जैसेथेच आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी 15 मार्च 2024 रोजी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची कपात करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 05:53 PM2024-09-30T17:53:09+5:302024-09-30T17:53:52+5:30

या इंधनांच्या किरकोळ विक्रीच्या किमती मार्च 2024 पासून जैसेथेच आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी 15 मार्च 2024 रोजी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची कपात करण्यात आली होती.

12 rupees on diesel Know how much profit oil companies make on one liter of petrol | डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. यामुळे, ऑईल मार्केट कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून बंपर नफा कमावताना दिसत आहेत. आयसीआरए (ICRA) च्या ताज्या अहवालानुसार, इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर 15 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 12 रुपये एवढा नफा कमावत आहेत.

आयसीआरएच्या अंदाजाप्रमाणे, 17 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या किमतींच्या तुलनेत तेल कंपन्यंची कमाई पेट्रोलवर 15 रुपये प्रति लीटर तर डिझेलसाठी 12 रुपये प्रति लीटर अधिक होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. मात्र, या इंधनांच्या किरकोळ विक्रीच्या किमती मार्च 2024 पासून जैसेथेच आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी 15 मार्च 2024 रोजी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची कपात करण्यात आली होती.
 
कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी घसरण - 
कॉर्पोरेट रेटिंग एजन्सी आयसीआरएचे सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट गिरीशुकमार कदम यांच्या मते, ऑईल मार्केटिंग कंपनीच्या मार्केटिंग मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. कारण गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. ICRA चा अहवालही हेच सांगत आहे.

याशिवाय, ICRA ने आपल्या अहवालात पुढे म्हटले आहे की, कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने, अलिकडच्या काही आठवड्यात भारतीय तेल कंपन्यांचे ऑटो इंधनाच्या किरकोळ विक्रीवरील विपणन मार्जिन सुधारले आहे.

Web Title: 12 rupees on diesel Know how much profit oil companies make on one liter of petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.