Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीपीएफसह १२ अल्पबचत योजनांचे व्याज वाढणार?; ३० जूनपर्यंत आढावा घेऊन निर्णय

पीपीएफसह १२ अल्पबचत योजनांचे व्याज वाढणार?; ३० जूनपर्यंत आढावा घेऊन निर्णय

अल्प बचत योजनांवरील व्याज दर हा सरकारसाठी संवेदनशील मुद्दा असून, दरात वाढ करण्यासाठी सरकारवर दबाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 06:49 AM2024-06-29T06:49:47+5:302024-06-29T06:50:07+5:30

अल्प बचत योजनांवरील व्याज दर हा सरकारसाठी संवेदनशील मुद्दा असून, दरात वाढ करण्यासाठी सरकारवर दबाव आहे.

12 small savings schemes with PPF will increase interest?; Decision after review by June 30 | पीपीएफसह १२ अल्पबचत योजनांचे व्याज वाढणार?; ३० जूनपर्यंत आढावा घेऊन निर्णय

पीपीएफसह १२ अल्पबचत योजनांचे व्याज वाढणार?; ३० जूनपर्यंत आढावा घेऊन निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकार जुलै - सप्टेंबर या तिमाहीसाठी ‘पीपीएफ’सह विविध अल्पबचत योजनांच्या व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. येत्या ३० जूनपर्यंत व्याज दरांचा आढावा घेतला जाणार असून, त्यात दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सुत्रांनी सांगितले.
सरकारने एप्रिल - जून तिमाहीसाठी व्याज दरात कोणताही बदल केला नव्हता. ७ तिमाहीत पहिल्यांदाच व्याज दरात वाढ करण्यात आली नव्हती. आता गुंतवणूकदारांना दिलासा दिला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

पीपीएफ दरात ४ वर्षांत कोणताही बदल नाही
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) दरात मागील ४ वर्षांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एप्रिल-जून २०२०मध्ये यात अखेरचा बदल करण्यात आला होता. कोरोना काळात अनेक बचत योजनांच्या व्याज दरात वाढ करण्यात आली होती. तथापि, पीपीएफचे व्याज दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. सुत्रांनी सांगितले की, अल्प बचत योजनांवरील व्याज दर हा सरकारसाठी संवेदनशील मुद्दा असून, दरात वाढ करण्यासाठी सरकारवर दबाव आहे.

सध्याचे व्याज दर
बचत खाते     ४%
एफडी १ वर्ष     ६.९%
एफडी २ वर्ष     ७.०%
एफडी ३ वर्ष     ७.१%
एफडी ५ वर्ष         ७.५%
आवर्ती ठेवी     ६.५%
ज्येष्ठ नागरिक ठेवी     ८.२%
मासिक उत्पन्न योजना     ७.४%
एनएससी     ७.७%
पीपीएफ     ७.१%
किसान विकास पत्र     ७.५%
सुकन्या समृद्धी     ८.२%

Web Title: 12 small savings schemes with PPF will increase interest?; Decision after review by June 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.