Lokmat Money > बिझनेस न्यूज > नीरवविरोधात १२ हजार पानांचे दोषारोपपत्र

नीरवविरोधात १२ हजार पानांचे दोषारोपपत्र

जप्त संपत्तीचाही उल्लेख; ईडीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:58 AM2018-05-25T01:58:46+5:302018-05-25T01:58:46+5:30

जप्त संपत्तीचाही उल्लेख; ईडीची कारवाई

12 thousand page chargesheet against silence | नीरवविरोधात १२ हजार पानांचे दोषारोपपत्र

नीरवविरोधात १२ हजार पानांचे दोषारोपपत्र

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणारा व परदेशात पळून गेलेला घोटाळेबाज हिरे व्यावसायिक नीरव मोदीविरोधात १२ हजार पानी दोषारोपपत्र येथील विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) ही कारवाई करण्यात आली आहे.
बनावट ‘लेटर आॅफ अंडरटेकिंग’चा (एलओयू) उपयोग करुन नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी रुपये घेऊन विदेशात पोबारा केला. या घोटाळ्याचा इडी तपास करीत आहे. मनी लॉन्डरिंग कायद्यांतर्गत ईडीने गुरूवारी दोषारोपपत्र दाखल केले.
हा घोटाळा १४ फेब्रुवारी २०१८ ला उघडकीस आल्यानंतर ईडीने नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या कोट्यवधींच्या असंख्य मालमत्ताही जप्त केल्या आहेत. या सर्व जप्त संपत्तींचा दोषारोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. बँकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचे इडीने नमूद केले आहे. या प्रकरणात आधी दोन दोषारोपपत्रे दाखल केली होती.

Web Title: 12 thousand page chargesheet against silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.