नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) सिन्टेक्स इंडस्ट्रीजने १,२०३.२६ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. पीएनबीच्या अधिकृत दस्तावेजातून ही माहिती समोर आली आहे.
सेबीने बंधनकारक केलेल्या ‘सूचिबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता’ (एलओडीआर) तरतुदी आणि बँकेचे धोरण यानुसार, पीएनबीने दाखल केलेल्या नियामकीय दस्तावेजात ही माहिती देण्यात आली आहे. बँकेने म्हटले की, ‘सिन्टेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ने घेतलेल्या १,२०३.२६ कोटी रुपयांच्या कर्जात घोटाळा केला आहे. कंपनीचे हे कर्जखाते ‘एनपीए’मध्ये गेले आहे. बँकेच्या अहमदाबाद झोनल कार्यालय शाखेशी संबंधित हे कर्ज प्रकरण आहे.पीएनबीने म्हटले की, सिन्टेक्सच्या कर्ज खात्यातील १,२०३.२६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात येत आहे. या कर्जासाठी बँकेने २१५.२१ कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे.
एनटीपीसीने मागविल्या निविदानवी दिल्ली : सरकारी मालकीच्या एनटीपीसी या संस्थेने औष्णिक वीज केंद्रांसाठी लागणारे बायोमास गोळे खरेदी करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. भुसा आणि अन्य ज्वलनशील पदार्थ यांचे मिश्रण करून हे गोळे बनविले जातात.