Lokmat Money > बिझनेस न्यूज > ईशान्य दिल्लीतून 1.25 कोटींच्या नव्या नोटा जप्त

ईशान्य दिल्लीतून 1.25 कोटींच्या नव्या नोटा जप्त

नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या

By admin | Published: March 26, 2017 01:40 PM2017-03-26T13:40:59+5:302017-03-26T13:41:32+5:30

नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या

1.25 crore new currency seized from North East Delhi | ईशान्य दिल्लीतून 1.25 कोटींच्या नव्या नोटा जप्त

ईशान्य दिल्लीतून 1.25 कोटींच्या नव्या नोटा जप्त

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र आता राजधानीत चक्क 1.25 कोटींच्या 2000 आणि 500च्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरून हे पैसे जप्त करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत ईशान्य दिल्लीतल्या सेलमपूरमधल्या माचली भागातून कारमधून पैसे हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती डीसीपी अजित सिंगला यांनी दिली आहे. तर पहिल्या घटनेत पश्चिम विहारमधून 24 वर्षांच्या जसमीत सिंग याच्याकडून 50 लाख जप्त करण्यात आले आहेत. तर दुस-या घटनेत शांती नगरमध्ये राहणा-या पंकज या व्यक्तीकडून 25 लाख जप्त करण्यात आले आहेत. तसेच तिस-या घटनेत शाहदरा येथील अरुण याच्याकडून 50 लाखांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. कारमध्ये काही स्वाक्षरी न केलेले धनादेश आढळले आहेत.

या तिन्ही घटनेत पोलिसांनी 1.25 कोटींची रक्कम जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या पैशांमध्ये जास्त करून 2000 आणि 500च्या नव्या नोटा आहेत. तर 10 हजारांच्या 100 रुपयांच्या नोटाही हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची माहिती आम्ही निवडणूक निर्णय अधिका-यांना दिली आहे, असंही डीसीपी अजित सिंगला म्हणाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून, तीन कारही जप्त केल्या आहेत. 

Web Title: 1.25 crore new currency seized from North East Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.