नवी दिल्ली : देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना चालू महिनाअखेरीपर्यंत पथकरातून काहीसा दिलासा मिळणार आहे. महामार्गांवर पथकर भरण्यापासून दिलासा देण्यासाठी सरकारने फेब्रुवारीत देशभरातील सुमारे १२५ टोल नाके बंद करण्याचे संकेत आज दिले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, ‘आम्ही काही महामार्गांवरील जवळपास १२५ टोल नाके चालू महिना अखेरीपर्यंत बंद करणार आहोत. जवळपास ६१ मार्गांवरील टोल संकलन अगोदरच बंद करण्यात आले आहे.’ तसेच ५० कोटींहून कमी गुंतवणुकीच्या रस्ता बांधणी योजनांना टोलमुक्त करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.
गडकरी यांनी कोलकाता येथील ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया अर्थात आयआयएमच्या अभ्यासाचा हवालात देत सांगितले की, इलेक्ट्रॉनिक टोल (ई-टोल) संकलन प्रणाली लागू झाल्यास ८८००० कोटी रुपयांची बचत होण्यास मदत मिळेल. या पथकर नाक्यांवर प्रतीक्षा करण्यात वाहनचालकांना खूप कमी वेळ लागला.
या अभ्यासात म्हटले की, विविध नाक्यांवर वाहन चालकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने हजारो कोटींचा चुराडा होता. सुमारे ६०,००० कोटी रुपयांची यात नासाडी होते. इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाने ८८,००० कोटी रुपयांची बचत होऊ शकते. दरम्यान, महाराष्ट्र गेल्या वर्ष अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत टोलमुक्तीचा मुद्दा गाजला होता. तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टोलमुक्ती देण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर यावरून घूमजाव केल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस सरकारवर केला जातो. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महिना अखेरीपर्यंत १२५ टोल गुंडाळणार
देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना चालू महिनाअखेरीपर्यंत पथकरातून काहीसा दिलासा मिळणार आहे. महामार्गांवर पथकर
By admin | Published: February 13, 2015 06:46 AM2015-02-13T06:46:54+5:302015-02-13T06:46:54+5:30