नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती या देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फाेसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती यांची कन्या आहे. अक्षता यांची इन्फाेसिसमध्ये हिस्सेदारी आहे. यापाेटी त्यांना गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १२६.६१ काेटी रुपयांचा लाभांश मिळाला आहे.
इन्फाेसिसतर्फे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अक्षता यांच्याकडे इन्फाेसिसचे ३.८९ काेटी शेअर्स हाेते. हा वाटा ०.९३ एवढा आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअरचा भाव १५२७.४० प्रतिशेअर एवढा हाेता. त्यानुसार, अक्षता यांच्याकडील शेअर्सची एकूण किंमत ५ हजार ९५६ काेटी रुपये एवढी आहे. सुनक यांनी २००९ मध्ये अक्षता यांच्याशी विवाह केला हाेता.
१६ रुपये प्रतिशेअर लाभांशइन्फाेसिसने गेल्या आर्थिक वर्षात १६ रुपये प्रतिशेअर एवढा लाभांश दिला हाेता. तर चालू वर्षात १६.५ रुपये प्रतिशेअर एवढा लाभांश जाहीर केला आहे. या दाेन्ही लाभांशापाेटी अक्षता मूर्ती यांना १२६.६१ काेटी रुपये एकूण रक्कम मिळाली आहे.