Lokmat Money > बिझनेस न्यूज > १२६ वर्षे जुन्या Godrej समूहाचं होणार विभाजन; कुलपांच्या विक्रीतून झालेली सुरूवात, पाहा अपडेट

१२६ वर्षे जुन्या Godrej समूहाचं होणार विभाजन; कुलपांच्या विक्रीतून झालेली सुरूवात, पाहा अपडेट

गोदरेज हे नाव तुमच्या सर्वांच्याच परिचयाचं असेल. परंतु आता त्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 11:37 AM2023-10-03T11:37:21+5:302023-10-03T11:38:06+5:30

गोदरेज हे नाव तुमच्या सर्वांच्याच परिचयाचं असेल. परंतु आता त्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

126 year old Godrej group to be split Starting with the sale of locks see Update adi godrej nadir godrej | १२६ वर्षे जुन्या Godrej समूहाचं होणार विभाजन; कुलपांच्या विक्रीतून झालेली सुरूवात, पाहा अपडेट

१२६ वर्षे जुन्या Godrej समूहाचं होणार विभाजन; कुलपांच्या विक्रीतून झालेली सुरूवात, पाहा अपडेट

गोदरेज हे नाव तुमच्या सर्वांच्याच परिचयाचं असेल. परंतु आता त्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. १.७६ लाख कोटींचं मूल्यांकन असलेल्या गोदरेज समूहानं (Godrej Group) आपल्या कामकाजाची सुरुवात तब्बल ५ दशकांपूर्वी केली होती. मुंबईत कुलपांची विक्री करत कंपनीनं आपला हा प्रवास सुरू केला होता. परंतु आता आपल्या विविध व्यवसायांचं औपचारिक विभाजन पूर्ण करण्यासाठी चर्चा आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. टॉप इंडस्ट्री अधिकाऱ्यांनी ईटीला यासंदर्भातील माहिती दिली आहे.

गोदरेज कुटुंबात दोन ग्रुप आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएट्सचं नेतृत्व आदि गोदरेज आणि त्यांचे भाऊ नादिर करतात. तर गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं कामकाज त्यांचे चुलते जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज कृष्णा पाहतात. या दोन्ही ग्रुपद्वारे इंजिनिअरिंग, उपकरणं, सिक्युरिटी सोल्युशन्स, अॅग्रीकल्चर प्रोडक्ट, रियल इस्टेट आणि कंझ्युमर प्रोडक्ट्स सारख्या बिझनेस वर्टिकल्सच्या औपचारिक विभाजनाला लवकरच अंतिम रुप मिळणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. फॅमिली काऊन्सिल या विभाजनाशी निगजीत काही महत्त्वाच्या बाबी सोडवत आहे.

३४०० एकर जमिनीचं विभाजन
या व्यवहाराची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं की यामध्ये जीअँडबी अंतर्गत असलेल्या ३४०० एकरच्या प्राईम लँड पार्सल्सच्या विभाजन आणि इक्विटी क्रॉस होल्डिंगचं प्रकरण सोडवायचं आहे. जमिनीबाबतची काही प्रकरणं सोडवण्याची आवश्यकता आहे, असं एका अधिकाऱ्यानं म्हटल्याचं रिपोर्टमध्ये नमूद केलंय. टॅक्सशी निगडीत काही बाबी पाहता जीअँडबीमधून पार्सल ट्रान्सफर करणं कठीण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

हे विभाजन करणं एक आव्हान आहे आणि व्हॅल्युएशन कसं केलं जाईल आणि दोन्ही बाजूंसाठी न्यायिक प्रस्ताव कसा काम करेल हेच संघर्षाचं महत्त्वाचं कारण होतं. भारतीय उद्योग समूहातील दिग्गज कंपनी गोदरेज समूहाच्या विभाजनासमोर आर्थिक आणि कायदेशील आव्हानं आहेत.

Web Title: 126 year old Godrej group to be split Starting with the sale of locks see Update adi godrej nadir godrej

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.