Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबईचा 12वी पास ऑटोवाला; Auto चालवताना सुचली कल्पना...मग बनला शेअर मार्केट एक्सपर्ट!

मुंबईचा 12वी पास ऑटोवाला; Auto चालवताना सुचली कल्पना...मग बनला शेअर मार्केट एक्सपर्ट!

मुंबईच्या ऑटोवाल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 04:17 PM2023-12-13T16:17:30+5:302023-12-13T16:18:09+5:30

मुंबईच्या ऑटोवाल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

12th Pass Autowala of Mumbai; Got the idea while driving an auto... then became a stock market expert! | मुंबईचा 12वी पास ऑटोवाला; Auto चालवताना सुचली कल्पना...मग बनला शेअर मार्केट एक्सपर्ट!

मुंबईचा 12वी पास ऑटोवाला; Auto चालवताना सुचली कल्पना...मग बनला शेअर मार्केट एक्सपर्ट!

Mumbai Auto Driver Share Market Expert: मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते, दररोज लाखो लोक आपली घेऊन देशाच्या आर्थिक राजधानीत येतात. पण, या शहरात आपली स्वप्ने पूर्ण करणे इतके सोपे नाही. ही मायानगरी सर्वांना मोठं होण्याची संधी देते, त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आम्ही अशा एका 12वी पास ऑटोवाल्याची गोष्ट सांगणार आहोत, जो ऑटो चालवता-चालवता शेअर मार्केट तज्ञं झाला.

शेअर बाजारात दररोज लाखो कोटी रुपयांची उलाढाल होते. गुंतवणूकदार तज्ञांच्या सल्ल्यानुसार पैसे लावतात आणि मोठी कमाई करतात. मुंबईच्या रस्त्यांवर ऑटो चालवणारा विशाल पाईकरावदेखील शेअर बाजारात पैसे लावण्याचे सल्ले देतो. यासोबतच विशाल ऑटो चालवून स्वत:ला आणि त्याच्या कुटुंबाला आधार देतो. कोणीतरी तुम्हाला काम देईल, याची वाट न पाहता आपली ध्येप्राप्ती कशी करावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंग तज्ज्ञ विशाल पाईकराव आहे.

बारावीनंतर शिक्षण सोडले
आपली स्वप्ने घेऊन मायानगरीत येणाऱ्या बहुतांश लोकांप्रमाणेच विशाललाही काहीतरी मोठे करायचे होते, परंतु काही जबाबदाऱ्यांमुळे तो बारावीच्या पुढे शिक्षण घेऊ शकला नाही. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्याला अभ्यास सोडून कामाच्या शोधात जावे लागले. सुरुवातीला त्याने कुरिअर बॉय म्हणून काम केले, पण त्याच्या मनात काही वेगळेच सुरू होते. नोकरी करत असतानाच तो शेअर बाजाराकडे वळला आणि शेअर बाजारातील बारकावे समजून घेण्यासोबतच त्याने ट्रेडिंगच्या युक्त्याही आत्मसात केल्या.

पुढे विशालने ऑटो चालवायला घेतला आणि टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेडिंग शिकण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्याने आपल्या बचतीतून मार्केटमध्ये छोटी-मोठी ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली. बाजार उघडण्यापूर्वी तो दररोज सकाळी संपूर्ण मुंबईत ऑटो चालवतो आणि आपला उदरनिर्वाह करतो. यानंतर तो शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक, तिथूनही कमाई करतो.

गुंतवणूकदारांना देतो टिप्स 
विशाल पाईकाराव केवळ स्वतःच व्यापार करत नाहीत, तर गुंतवणूकदारांना शेअर बाजारात पैसे गुंतवण्याच्या महत्त्वाच्या आणि फायदेशीर टिप्सही देतो. ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, त्यांना तो शेअर मार्केट शिकवतो. ट्रेडिंगमुळे आयुष्यात खूप बदल झाल्याचे विशाल सांगतो. फक्त ऑटो चालवून चांगली कमाई होत नाही, त्यामुळेच विशालने शेअर मार्केटला उत्पन्नाचे दुसरे साधन बनवले आहे.

(नोट- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) 

Web Title: 12th Pass Autowala of Mumbai; Got the idea while driving an auto... then became a stock market expert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.