नवी दिल्ली : स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन ओवरसीज बँक यांच्यासह १३ सरकारी बँकांना सरकारने मंगळवारी २२,९१५ कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले आहे. एकूणच बँकांचे व्यवहार वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, ‘चालू आर्थिक वर्षातील भांडवलाचा हा पहिला टप्पा आहे. सरकारी बँकांच्या कार्यक्षमतेनुसार भविष्यात आणखी मदत देण्याबाबत विचार केला जाईल. कर्ज वितरणातील अडचणी या माध्यमातून दूर होऊ शकतात. भांडवलापैकी भारतीय स्टेट बँकेला ७,५७५ कोटी, इंडियन ओवरसीज बँक ३,१०१ कोटी, तर पंजाब नॅशनल बँकेला २,८१६ रुपयांचे भांडवल देण्यात आले आहे. याशिवाय बँक आॅफ इंडिया १,७८४ कोटी, सेंन्ट्रल बँक आॅफ इंडिया १,७२९ कोटी, सिंडिकेट बँक १,०३४ कोटी, युको बँक १,०३३ कोटी, कॅनरा बँक ९९७ कोटी, युनायटेड बँक आॅफ इंडिया ८१० कोटी, युनियन बँक आॅफ इंडिया ७२१ कोटी, कॉर्पोरेशन बँक ६७७ कोटी, देना बँक ५९४ कोेटी, अलाहाबाद बँक ४४ कोटी याप्रमाणे बँकांना अर्थसहाय्य दिले.’>स्टेट बँकेला सर्वाधिकया भांडवलापैकी सर्वाधिक मदत स्टेट बँकेला मिळणार असून, सर्वांत कमी मदत अलाहाबाद बँकेला मिळणार आहे. सरकारी बँका बुडीत कर्जामुळे त्रस्त आहेत. त्यांना ही मदत लवकर मिळाल्यास कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यास त्यांना मदत होईल.
१३ बँकांना मिळणार २२ हजार कोटी रुपये
By admin | Published: July 20, 2016 4:31 AM