राष्ट्रनिर्मिती आणि आर्थिक क्षेत्रातील शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण वाटचाल करताना, मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि आयआयटी मुंबई यांनी ऐतिहासिक भागीदारी केली आहे. या सहकार्यांतर्गत आयआयटी मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १३० कोटी रुपयांचा धनादेश मोतीलाल ओसवाल फाऊंडेशनकडून सुपूर्द करण्यात आला.
सामंजस्य करारांतर्गत, आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील १ ते १.२ लाख चौरस फूट क्षेत्रफळात मोतीलाल ओसवाल नॉलेज सेंटर स्थापन केलं जाईल. हा अत्याधुनिक शैक्षणिक ब्लॉक नावीन्य, संशोधनासाठी केंद्र म्हणून काम करेल. मोतीलाल ओसवाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईमध्ये जागतिक दर्जाची प्रतिभा आकर्षित करण्यास सक्षम करेल आणि विज्ञान तसंच तंत्रज्ञानात जागतिक स्तरावरील नेतृत्व बनण्यासही मदत करेल.
इतकंच नाही,तर कॅपिटल मार्केटसाठी मोतीलाल ओसवाल केंद्र तयार करणं जे आर्थिक बाजारपेठेतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि ऑनलाइन डिप्लोमा ऑफर करणार आहे.