Join us  

१.३७ लाख कोटींची तीन वर्षांत करचोरी!

By admin | Published: April 07, 2017 11:48 PM

गेल्या तीन वर्षांमध्ये वर्षात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष करातील १.३७ लाख कोटी रुपयांची कर चोरी आढळून आल्याची माहिती महसूल विभागाने दिली

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांमध्ये वर्षात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष करातील १.३७ लाख कोटी रुपयांची कर चोरी आढळून आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. करचोरीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या अशा एक हजार कंपन्यांची ओळख पटविण्यात आली असून या माध्यमातून १३,३०० कोटी रुपयांचे बनावट व्यवहार झाले असल्याचेही महसूल विभागाने म्हटले आहे. बेनामी व्यवहार मनाई कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून नोव्हेंबर २०१६ पासून हा कायदा अस्तित्वात आला आहे. यानुसार, २४५ बेनामी देवाण घेवाणीच्या व्यवहारांची ओळख पटविण्यात आली आहे. १२४ प्रकरणात ५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. महसूल विभागाने एकूण २३ हजार ६४ प्रकरणाची तपासणी केली. यातील १७,५२५ प्रकरणात प्राप्तिकर विभाग आणि उर्वरित प्रकरणात अबकारी, सेवा आणि सिमाशुल्क विभागाने तपासणी मोहीम चालविली आहे.गेल्या तीन वर्षांत म्हणजे २०१३ ते १५ आणि ते २०१५ ते १६ या काळात १.३७ लाख कोटी रुपयांची कर चोरी झाली, असे आढळून आले आहे. यातील ६९,४३४ कोटी रुपये प्राप्तिकर विभाग, ११,४०५ कोटी रुपये सीमा शुल्क विभाग, १३,९५२ कोटी रुपये केंद्रीय अबकारी विभागांतर्गत आणि ४२,७२७ कोटी रुपयांचा सेवा कर यांचा समावेश आहे. एकूण २८१४ प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. यातील १९६६ प्रकरणे प्राप्तिकराशी संबंधित आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण ३८९३ जणांना अटक करण्यात आली होती. विशिष्ट आर्थिक लाभाच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या ११५५ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली. या कंपन्या १३ हजार ३०० कोटी रुपयांच्या बनावट देवाण घेवाण प्रकरणात सहभागी झाल्याचे दिसून आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मनी लाँड्रिंगची ५१९ प्रकरणे सक्तवसुली संचालनालयाने ५१९ प्रकरणात मनी लाँड्रिगनुसार कारवाई केली आहे. ७९ प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे. १४,९३३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.>गेल्या तीन वर्षांमध्ये कोणत्या क्षेत्रात किती कोटी रुपयांची करचोरी झाली याची आकडेवारी...42,727एकूण सेवा कर69,436प्राप्तिकर विभाग13,952अबकारी विभाग11,405सीमाशुल्क विभाग