Lokmat Money > बिझनेस न्यूज > १३, १४ जुलैला आयसीएआय तर्फे 'टॅक्स क्लिनिक'चं आयोजन, रिटर्न संदर्भातील समस्यांचं करणार निराकरण

१३, १४ जुलैला आयसीएआय तर्फे 'टॅक्स क्लिनिक'चं आयोजन, रिटर्न संदर्भातील समस्यांचं करणार निराकरण

३१ जुलै २०२३ इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख आहे. त्यापूर्वी आपले रिटर्न भरुन घेण्याचं आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:25 PM2023-07-12T12:25:11+5:302023-07-12T12:26:15+5:30

३१ जुलै २०२३ इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख आहे. त्यापूर्वी आपले रिटर्न भरुन घेण्याचं आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आलंय.

13th and 14th July ICAI will organize a free Tax Clinic to solve the problems related to returns itr | १३, १४ जुलैला आयसीएआय तर्फे 'टॅक्स क्लिनिक'चं आयोजन, रिटर्न संदर्भातील समस्यांचं करणार निराकरण

१३, १४ जुलैला आयसीएआय तर्फे 'टॅक्स क्लिनिक'चं आयोजन, रिटर्न संदर्भातील समस्यांचं करणार निराकरण

सध्या अनेकांच्या मनात इन्कम टॅक्स रिटर्नबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतील. ३१ जुलै २०२३ इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख आहे. त्यापूर्वी आपले रिटर्न भरुन घेण्याचं आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आलंय. दरम्यान, करदात्यांच्या मनात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासंबंधी असलेल्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आयसीएआय तर्फे 'टॅक्स क्लिनिक'चं आयोजन करण्यात आलंय.

द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या नवी मुंबई शाखेतर्फे १३ आणि १४ जुलै रोजी 'टॅक्स क्लिनिक'चं आयोजन करण्यात येणार आहे. आयसीएआय, नवी मुंबई शाखा परिसर, ऑफिस नंबर २२०, शिव सेंटर बिल्डिंग, अरेंजा कॉर्नरजवळ, सेक्टर १७, वाशी येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ६ दरम्यान करदात्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं जाणार आहे. 

१६८ शाखा तसंच रिजनल कौन्सिल आणि सीबीडीटीच्या सहकार्यानं आयसीएआयनं देशभरात 'टॅक्स क्लिनिक'चं आयोजन केलं आहे. 'टॅक्स क्लिनिक'मध्ये करदात्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासंबंधीच्या प्रश्नांचं निराकरण करण्यात येईल. 

Web Title: 13th and 14th July ICAI will organize a free Tax Clinic to solve the problems related to returns itr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.