नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा रोजगार वाढत आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (ईपीएफओ) डिसेंबर २०२१ मध्ये १४.६० लाख नवे सदस्य मिळाले आहेत. हा आकडा डिसेंबर २०२० च्या तुलनेत १६.४० टक्क्यांनी अधिक आहे. डिसेंबर २०२० मध्ये १२.५४ लाख नवीन सदस्य मिळाले होते. नोव्हेंबर २०२१ च्या तुलनेत ही वाढ १९.९८ टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबरमध्ये हा आकडा १२.१७ लाख रुपये होता.
सूत्रांनी सांगितले की, १४.६० लाख शुद्ध सदस्यांपैकी ९.११ लाख लोक पहिल्यांदाच ईपीएफओशी जोडले गेले आहे. ५.४९ लाख लोक आधी ईपीएफओशी जोडले गेलेले होते. तथापि, काही कारणांनी त्यांना ईपीएफओ सोडावे लागले होते. सदस्य जोडण्याच्या बाबतीत महाराष्ट्र आणि हरियाणा आघाडीवर आहेत.
महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतून सुमारे ८.९७ लाख सदस्य ईपीएफओला मिळाले आहे. हे प्रमाण एकूण रोजगाराच्या ६१.४४ टक्के आहे. नव्या सदस्यांत महिलांची संख्या ३ लाख आहे.