नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात भारतीयांनी जाेरदार खरेदी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, क्रेडिट कार्डचा वापर करून खर्च करण्याकडे कल वाढलेला आहे. मार्च महिन्यात तब्बल १.३७ लाख काेटी रुपयांचा खर्च क्रेडिट कार्डचा वापर करून करण्यात आलेला आहे. त्यातही ६३% खर्च हा ऑनलाइन शाॅपिंगवर करण्यात आला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डद्वारे १४ लाख काेटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत त्यात ४७.२७ टक्के वाढ झाली आहे. काेराेना महामारी आटाेक्यात आल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले हाेते. त्यानंतर देशभरात लाेकांनी खरेदीचा सपाटाच लावला. सणासुदीनंतरही लाेकांनी मनसाेक्त खरेदी केली. त्यासाठी क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर करण्यात आला.
क्रेडिट कार्डचा यापूर्वी सर्वाधिक वापर गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये झाला. या कालावधीत दसरा, दिवाळीसह सणासुदीची धूम हाेती. एकूण १.२९ लाख काेटी रुपयांचा खर्च क्रेडिट कार्ड वापरून करण्यात आला. मात्र, सणासुदीचा हंगाम वगळता इतर महिन्यांमध्येही जाेरदार खरेदी झाली आहे. वर्षभरापासून क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे.
क्रेडिट कार्डच्या बाजारपेठेत आघाडी कुणाची?
n देशातील क्रेडिट कार्डच्या बाजारपेठेत कार्डची संख्या आणि खर्च यामध्ये एचडीएफसी बॅंक गेल्या आर्थिक वर्षात आघाडीवर राहिली.
n एकूण खर्चामध्ये बॅंकेचा वाटा २७.४१ टक्के, तर कार्डच्या संख्येत २०.५५ टक्के वाटा हाेता. त्यानंतर एसबीआय कार्ड, आयसीआयसीआय
आणि ॲक्सिस बॅंकेचा क्रमांक लागताे.
क्रेडिट कार्ड देशात वितरित
१११.५लाख आर्थिक वर्ष २०२२
११६.७लाख आर्थिक वर्ष २०२३
सलग तेराव्या महिन्यात क्रेडिट कार्डवरून झालेला खर्च १ लाख काेटींपेक्षा जास्त आहे.
या बॅंकांनी दिले सर्वाधिक कार्ड
गेल्या वर्षी सिटी बॅंकेचे ॲक्सिस बॅंकेत विलीनीकरण झाले. त्यामुळे ते ग्राहक ॲक्सिस बॅंकेला मिळाले. १९.३ लाख कार्ड ॲक्सिस बॅंकेने जाेडले आहेत.
चिंताही वाढली
क्रेडिट कार्डची थकबाकीही माेठ्या प्रमाणावर वाढली आहे. मार्च महिन्यामध्ये त्यात ३०% वाढ झाली. सध्या ही थकबाकी १.८७ लाख काेटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर आहे.
६ पटींनी भारतात वाढला गेल्या ८ वर्षांत क्रेडिट कार्डचा वापर
२०१६ २.४
२०१७ ३.३
२०१८ ४.६
२०१९ ६.०३
२०२० ७.३०
२०२१ ६.३०
२०२२ ९.७१
२०२३ १४.३
आकडे : खर्च लाख काेटींत
ही आहेक कारणे
उत्पनन वाढले, खर्च करण्याच्या बदलत्या सवयी, आपात्कालीन
खर्च, सणासुदीचा खर्च, आकर्षक रिवाॅर्ड
भारतात १०० पैकी ४ जणांकडे क्रेडिट कार्ड आहे. इतर देशांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. अमेरिकेत एका व्यक्तीकडे ३ पेक्षा जास्त कार्डस् आहेत.
अमेरिका ३४०
ब्राझील १३२
ब्रिटन ९२
चीन ५५
भारत ०४