Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनंत अंबानीच्या लग्नापूर्वी बांधली 14 मंदिरे; भारतीय वारसा, परंपरा जपण्याचा प्रयत्न

अनंत अंबानीच्या लग्नापूर्वी बांधली 14 मंदिरे; भारतीय वारसा, परंपरा जपण्याचा प्रयत्न

जामनगर : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या बहुप्रतीक्षित विवाहाची शुभ सुरुवात म्हणून अंबानी कुटुंबाने गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:22 AM2024-02-28T06:22:09+5:302024-02-28T06:22:23+5:30

जामनगर : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या बहुप्रतीक्षित विवाहाची शुभ सुरुवात म्हणून अंबानी कुटुंबाने गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या ...

14 temples built before Anant Ambani's marriage; Trying to preserve Indian heritage, tradition | अनंत अंबानीच्या लग्नापूर्वी बांधली 14 मंदिरे; भारतीय वारसा, परंपरा जपण्याचा प्रयत्न

अनंत अंबानीच्या लग्नापूर्वी बांधली 14 मंदिरे; भारतीय वारसा, परंपरा जपण्याचा प्रयत्न

जामनगर : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या बहुप्रतीक्षित विवाहाची शुभ सुरुवात म्हणून अंबानी कुटुंबाने गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या एका विशाल मंदिर संकुलात १४ नवीन मंदिरे बांधली आहेत.

कोरीव खांब, देवी-देवतांची शिल्पे, फ्रेस्को-शैलीतील चित्रे आणि पिढ्यानपिढ्यांच्या कलात्मक वारशातून प्रेरित वास्तुकला असलेले, हे मंदिर संकुल भारताची समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख विवाह सोहळ्याच्या केंद्रस्थानी ठेवते. प्रसिद्ध शिल्पकारांनी जिवंत केलेली, मंदिरातील कलाकृती जुनी तंत्रे आणि परंपरा वापरून साकारण्यात आली आहे. हा उपक्रम भारतीय वारसा, परंपरा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांची दृष्टी दाखवून देतो. त्यात स्थानिक कारागिरांच्या अविश्वसनीय कौशल्यांवर प्रकाश पडतो.

जामनगरमधील मोतीखावाडी येथील मंदिर संकुलातील स्थानिक लोक आणि कारागिरांशी संवाद साधताना नीता अंबानी यांनी त्यांनी बनवलेल्या कलाकृतींची माहिती घेतली आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. मंदिर परिसरात उपस्थित स्थानिक लोक आणि कारागिरांनी सांगितले की, यामुळे त्यांनाही या लग्नसोहळ्याचा भाग असल्यासारखे वाटते.

ईशा अंबानी आणि जुळ्या मुलांचे अँटिलियात स्वागत 
nईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांना डिसेंबर २०२२ मध्ये जुळी मुले झाली. ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी मुलगी आहे. अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांनिमित्त ईशा आणि आनंद एका महिन्यानंतर मुंबईत परतले. 

nआदिया आणि कृष्णा या दोन्ही मुलांचे अंबानी कुटुंबाचे निवासस्थान अँटिलिया येथे भव्य स्वागत करण्यात आले. पर्किन्स अँड विल यांनी दोन नवजात मुलांसाठी पाळणाघराची खास रचना केली होती.

कुटुंबात आनंदी आनंद
जामनगरमध्ये सध्या उत्सवाचे वातावरण आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबईत झाला. त्यापूर्वी रोका सोहळा पार पडला. हा विधी २९ डिसेंबर २०२२ रोजी राजस्थानमधील नाथद्वारा येथे असलेल्या श्रीनाथजींच्या मंदिरात झाला. 

अनंत आणि राधिका यांनी नाथद्वारामध्ये एक दिवस घालवला आणि श्रीनाथजींचे आशीर्वाद घेतले. या दोघांनीही मंदिरात आयोजित राजभोग शृंगारात भाग घेतला होता. यावेळी दोन्ही कुटुंबेही तेथे उपस्थित होती. यानंतर मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सलमान खान, शाहरूख खान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसारखे स्टार्स सहभागी झाले होते.

Web Title: 14 temples built before Anant Ambani's marriage; Trying to preserve Indian heritage, tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.