Lokmat Money > बिझनेस न्यूज > १,४०० कर्मचाऱ्यांना स्पाइसजेट देणार नारळ; आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण 

१,४०० कर्मचाऱ्यांना स्पाइसजेट देणार नारळ; आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण 

सध्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचीही माहिती आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 05:42 AM2024-02-13T05:42:03+5:302024-02-13T05:42:28+5:30

सध्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचीही माहिती आहे.

1,400 employees will soon be laid off from the company due to the fragile financial condition of the SpiceJet company | १,४०० कर्मचाऱ्यांना स्पाइसजेट देणार नारळ; आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण 

१,४०० कर्मचाऱ्यांना स्पाइसजेट देणार नारळ; आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण 

मुंबई : स्पाइसजेट कंपनीची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच कंपनीतून १,४०० कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. एकीकडे अन्य विमान कंपन्यांमध्ये विस्तार व भरती प्रक्रिया सुरू असताना स्पाइसजेट कंपनीत मात्र कर्मचारी कपात करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, कंपनीच्या ताफ्यात सध्या ३० विमाने असून, एकूण नऊ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी वर्षाकाठी कंपनी ६० कोटी रुपयांचा खर्च होतो. आर्थिक समस्या निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ही कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक देय अद्याप मिळालेले नाही तसेच काही कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतनदेखील मिळाले नसल्याची माहिती आहे. दरम्यान, सध्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचीही माहिती आहे.

Web Title: 1,400 employees will soon be laid off from the company due to the fragile financial condition of the SpiceJet company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.